Water Storage : नाशिक जिल्ह्यातील धरणांचा पाणीसाठा ८ टक्क्यांवर

Water Scarcity : त्यामुळे पाणी संकट गंभीर होण्याच्या मार्गावर असून येणाऱ्या काळात पाण्याचे काटेकोर नियोजन करावे लागणार आहे.
Water Storage
Water Storage Agrowon

Nashik News : जिल्ह्यात मॉन्सूनपूर्व पावसाचे सुरू आहे. मात्र धरणातील पाणीसाठ्यात कमालीची घट झाल्याने परिस्थिती गंभीर होत आहे. जिल्ह्यातील एकूण २४ धरण प्रकल्पांतील उपलब्ध पाणीसाठा अवघा ८ टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे पाणी संकट गंभीर होण्याच्या मार्गावर असून येणाऱ्या काळात पाण्याचे काटेकोर नियोजन करावे लागणार आहे.

जिल्ह्यातील २४ मध्यम व मोठ्या धरण प्रकल्पांत शुक्रवारअखेर (ता. ७) मागील वर्षी धरणातील उपयुक्त पाणीसाठा २५.५७ टक्के होता. तर यावर्षी तो अवघा ८.४८ टक्के इतका आहे. त्यामुळे यंदा हा साठा १३ टक्क्यांहून कमी असल्याची गंभीर परिस्थिती आहे. गत पावसाळ्यात सप्टेंबरअखेर पाणीसाठा ८५ टक्क्यांवर होता.

Water Storage
Water Storage : खानदेशात सिंचन प्रकल्पांमधील जलसाठा २७ टक्क्यांवर

टप्प्याटप्प्याने त्यात घट झाली आहे. धरणे भरल्यानंतर त्यातून विसर्ग करण्यात आला होता. मात्र नोव्हेंबरनंतर पाणीसाठा टप्प्याटप्प्याने कमी होत गेला. तापमानात झालेली वाढ त्यामुळे बाष्पीभवन व पाण्याच्या मागणीमुळे त्यात कमालीची घट झाली. सध्या पाणीसाठ्याची परिस्थिती चिंताजनक आहे.

त्यात गंगापूर धरण समूहात १८.२७ टक्के, गिरणा समूहात पाणीसाठा १०.७५ टक्के, दारणा समूहात ४.७७ टक्के, तर पालखेड समूहात तो शून्यावर आला आहे. त्यामुळे लक्षणीय घट गंभीर अडचणीची असून, पाणी वापर काटकसरीने करावा लागणार आहे.

सध्या सिंचन अवर्तने बंद असून बिगर सिंचन आवर्तन पिण्याचे पाण्यासाठी प्राधान्याने दिले जात आहे. अनेक धरणांमध्ये पाणीसाठा संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. तर काही ठिकाणी फक्त मृतसाठा शिल्लक राहिला आहे.

Water Storage
Water Storage : मराठवाड्यात ११ पैकी ५ मोठे प्रकल्प मृत साठ्यात

पालखेड धरण समूहातील ओझरखेड, पुणेगाव, तिसगाव यासह भावली, वालदेवी, भोजपूर व गिरणा धरण समूहातील नाग्यासाक्या, माणिकपुंज ही धरणे कोरडी झाली आहेत. येथे पाणी नसल्याने सिंचनासाठी नाहीच मात्र परिसरात पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न आहे.

जिल्ह्यातील धरणसाठ्याची तुलनात्मक

स्थिती (ता. २५ ऑगस्टअखेर/द.ल.घ.फू)

धरण उपयुक्त साठा पाणीसाठा

(२०२३) टक्केवारी पाणीसाठा (२०२४) टक्केवारी

गंगापूर ५,६३० २,१२० ३७.६६ १,२१३ २१.५५

कश्यपी १,८५२ २८४ १५.३३ ४३४ २३.४३

गौतमी गोदावरी १,८६८ १८५ ९.९० १९७ १०.५५

आळंदी ८१६ ५९ ७.२३ १३ १.५९

पालखेड ६५३ ३०२ ४६.२५ १५१ २३.१२

करंजवण ५,६७१ ७४० १३.७८ १०० १.८६

वाघाड २,३०२ १६६ ७.२१ ७३ ३.१७

ओझरखेड २,१३० ५५२ २५.९२ ० ०

पुणेगाव ६२३ ८८ १४.१३ ० ०

तिसगाव ४५५ १८.३.९६ ० ०

दारणा ७,१४९ २,३०३ ३२.२१ २६६ ३.७२

भावली १,४३४ १२५ ८.७२ ० ०

मुकणे ७,२३९ २८३५ ३९.१६ २५६ ३.५४

वालदेवी १,१३३ २३९ २१.०९ ० ०

कडवा १६८८ ३८२ २२.६३ १२७ ७.५२

भोजापूर ३६१ ५६ १५.५१ ० ०

चणकापुर २,४२७ ६८२ २८.१० १११ ४.५७

हरणबारी १,१६६ ४१६ ३५.६८ ९१ ७.४०

केळझर ५७२ २०१ ३५.१४ ३ ०.९२

नागासाक्या ३९७ ० ० ० ०

गिरणा १८,५०० ४३६२ २३.५८ २२.७५ १२.३०

पुनद १,३०६ ४५१ ३४.५३ ३ ०.५३

माणिकपुंज ३३५ ० ० ० ०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com