Paddy Procurement Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy Procurement : भात खरेदी केंद्रांकडे शेतकऱ्यांची पाठ

Paddy MSP : खरीप हंगामात यंदा भाताचे भरघोस पीक झाले असले तरी हमीभावाने भातखरेदीला अल्‍प प्रतिसाद मिळत आहे.

Team Agrowon

Alibaug News : खरीप हंगामात यंदा भाताचे भरघोस पीक झाले असले तरी हमीभावाने भातखरेदीला अल्‍प प्रतिसाद मिळत आहे. जिल्‍ह्यातील २८ केंद्रांवर आतापर्यंत तीन लाख ६९ हजार क्विंटल भाताची खरेदी झाली आहे.

गतवर्षी तब्‍बल सहा लाख ५१ हजार क्विंटल भातखरेदी झाली होती. सरकारने चांगला भाव देऊनही यंदा हमीभाव भातखरेदी केंद्रावर वर्दळ कमी झालेली दिसून येत आहे. हमीभाव केंद्रावर भातखरेदी कमी होण्यास अनेक कारणे आहेत.

यात वर्षभरातील कुटुंबाची गरज भागवून उरेल इतके धान्य पिकत नाही, याशिवाय खुल्या बाजारात मिळणाऱ्या वाढीव भावामुळे अनेक जण हमीभाव केंद्रात भातखरेदीसाठी नोंदणीच करीत नाहीत.सरकारने यंदा भाताला सरसकट प्रतिहेक्‍टरी २० हजार रुपये बोनस जाहीर केला आहे.

यंदा सर्वसाधारण भाताला दोन हजार ३०० रुपये प्रति क्विंटल भाव सरकारने दिला आहे तर ‘अ’ दर्जाच्या भाताला दोन हजार ३२० रुपये प्रति क्विंटल भाव जाहीर झाला आहे. ऑनलाइन नोंदणीच्‍या तुलनेत भात विकणाऱ्या शेतकऱ्यांची संख्‍याही कमी आहे.

आणखी काही दिवस केंद्रे सुरू राहणार असून भातखरेदीत वाढ होईल, अशी अपेक्षा जिल्‍हा मार्केटिंग अधिकारी केशव ताटे यांनी व्यक्त केली आहे.

हमीभाव केंद्रावर भात विकल्यानंतर पैसे लगेच मिळत नाहीत, पहिल्या टप्प्यात भाताची विक्री करणाऱ्यांनाही अद्याप पैसे मिळालेले नाहीत. बोनस जाहीर केला तरी तो कधी मिळेल, याबाबत शंका आहे. त्‍यामुळेच शेतकऱ्यांकडून कमी प्रतिसाद मिळत आहे.
- साईनाथ पाटील, प्रगतशील शेतकरी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bank Crop Loan: बॅंकांनी पीककर्ज प्रकरणांत सकारात्मकता ठेवावी : जिल्हाधिकारी संतोष पाटील

Maharashtra Sugar Industry: हंगामाच्या ५० दिवसांनंतरही सात कारखान्यांचे दरावर मौन

MPKV MoU Signed: कृषी विद्यापीठाचा ‘कार्डियन करेक्ट’शी करार

Honey Village Scheme: ‘मधाचे गाव’ योजना देणार रोजगाराचा गोडवा

Devendra Fadnavis BJP Victory: भाकीत खरं ठरलं! भाजपचा नवा रेकॉर्ड, किती जागा जिंकल्या?; फडणवीसांनी सांगितली आकडेवारी

SCROLL FOR NEXT