Arrest Agrowon
ॲग्रो विशेष

Corruption : ‘सीएससी’ केंद्रचालकासह दोन तलाठ्यांना अटक

Legal Action : अतिवृष्टीची रक्कम अपहार केल्याचे प्रकरण काही महिन्यांपूर्वी जिल्ह्यात जळगाव जामोद तहसील कार्यक्षेत्रात उघडकीस आले आहे. याप्रकरणी पोलिस आर्थिक गुन्हे शाखेने कारवाई करीत दोन तलाठ्यांसह सुविधा केंद्र चालवणाऱ्या एकाला ताब्यात घेतले.

 गोपाल हागे

Buldhana News : अतिवृष्टीची रक्कम अपहार केल्याचे प्रकरण काही महिन्यांपूर्वी जिल्ह्यात जळगाव जामोद तहसील कार्यक्षेत्रात उघडकीस आले आहे. याप्रकरणी पोलिस आर्थिक गुन्हे शाखेने कारवाई करीत दोन तलाठ्यांसह सुविधा केंद्र चालवणाऱ्या एकाला ताब्यात घेतले. या घटनेमुळे महसूल यंत्रणेत एकच खळबळ उडाली आहे.

जळगाव जामोद तालुक्यात २२ जुलै २०२३ रोजी अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. त्या वेळी शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी रकमेची मागणी केलेल्या अहवालात दोन तलाठी व संगणक चालकाने शेतकऱ्यांची काही बनावट नावे यादीत टाकली होती. हा अहवाल शासनाकडे सादर करून बनावट शेतकऱ्यांच्या नावाने लाखांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याची बाब समोर आलेली आहे.

याप्रकरणी संबंधिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पोलिसांनी तेव्हापासून तपासाला गती दिली होती. मात्र, गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी असलेले दोन्ही तलाठी फरार होते. त्यांनी जामीन मिळवण्यासाठी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल केला होता. हा अर्ज न्यायालयाने फेटाळल्यानंतर गुन्हे शाखेने तलाठी उमेश बिल्लेवार, तलाठी श्री. माटे आणि संगणक चालक महादेव पाटील अशा तिघांना बुधवारी (ता.२५) ताब्यात घेतले.

या आर्थिक गैरव्यवहारात महसूल यंत्रणेतील वरिष्ठ अधिकारी सहभागी असू शकतात, असा सुरुवातीपासून संशय व्यक्त केल्या जात आहे. हे प्रकरण गाजत असतानाच तेथील तहसीलदारांची तातडीने बदली करण्यात आली. या प्रकरणात जळगाव जामोद तालुक्यातील बोराळा, आसलगाव, धानोरा, वाडी खुर्द येथील बरेच दलाल अडकलेले आहेत. आता तपासाची चक्रे त्यांच्याकडे फिरू शकतात.

मुख्यमंत्र्यांकडे केली होती तक्रार

जळगाव जामोद तहसीलअंतर्गत शेती नसतानाही ७० लाभार्थी दाखवत शासनाची अंदाजे ५५ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक झाली आहे. अशी फसवणूक करणारे संबंधित कर्मचारी व दलालांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी उद्धव ठाकरे शिवसेनेने मुख्यमंत्र्यांकडे तेव्हा केली आहे. शासनाने ७२ जणांना नोटीस देत खुलासेही मागितले होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Karnataka Floods: शेतकऱ्यांना मोठा दिलासा! कर्नाटकात पीक नुकसानीची प्रति हेक्टर ८,५०० रुपये अतिरिक्त भरपाई

Sugarcane Farming: ऊस व्यवस्थापनातील महत्त्वाच्या बाबी 

Women Empowerment: सामाजिक समावेशकतेतूनच स्त्रीशक्तीचा जागर

Market Committee: बाजार समित्यांचे नसते उद्योग

Farmer Protest: शेतकरी कर्जमाफी, ओला दुष्काळ जाहीर करा

SCROLL FOR NEXT