Union Budget Agrowon
ॲग्रो विशेष

Union Budget 2025 : कृषी क्षेत्र केंद्रस्थानी ठेवून अर्थसंकल्प असावा

Agriculture Budget : कृषिप्रधान देशात शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेल्या शेतीमालाला बाजार भाव नाही. दरात अस्थिरता असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होते.

Team Agrowon

Nashik News : कृषिप्रधान देशात शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेल्या शेतीमालाला बाजार भाव नाही. दरात अस्थिरता असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होते. त्यामुळे प्रत्येक पीकनिहाय शाश्वत उपाययोजना करण्याची गरज आहे.

त्यासाठी देशाचा अर्थसंकल्प कृषी क्षेत्र केंद्रस्थानी असावा, अशी मागणी भाजप किसान मोर्चाचे नाशिक महानगर अध्यक्ष बापूराव पिंगळे यांची केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे, की इस्राईलमध्ये कृषी मालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव ठरवून दिलेले आहे. जर ठरवून दिलेल्या भावापेक्षा कमी भाव मिळाला तर तेथील सरकार उर्वरित रकमेची भरपाई तेथील शेतकऱ्यांना देते.

त्यामुळे तेथील शेतकरी अडचणीत येत नाही. अशा प्रकारच्या उपाययोजना भारतात केल्या तर शेतीमाल भावाचा जटील प्रश्न सुटेल. पर्यायाने भारतातील शेतकरी संपन्न होईल.

कृषी प्रकल्पांना चालना व प्रोत्साहन देणे, त्यातील अडीअडचणी दूर करणे, शासकीय कृषी योजनाचा प्रचार प्रसार, कृषी विभागामार्फत मिळणारे अनुदान, सवलती यांचा लाभ मिळाला पाहिजे. शेती अवजारे, वाहने, शेती उपयोगी वस्तू, कीटकनाशके व बी-बियाणे आदींची खरेदी जीएसटीमुक्त असावी. शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव मिळाला तर निश्चितच शेतकरी सुखी होईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT