Interim Budget Maharashtra
Interim Budget Maharashtra Agrowon
ॲग्रो विशेष

Interim Budget Maharashtra : कोल्हापूर आणि सांगली पूर रोखण्यासाठी राज्य अर्थसंकल्पात घोषणा

Aslam Abdul Shanedivan

Pune News : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प आज मंगळवारी (२७ रोजी) मांडला. यावेळी त्यांनी शेतकरी, कष्टकरी, महिला, विद्यार्थी, युवक, मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्याक, उद्योजक, व्यापारी घटकासह कोल्हापूर-सांगली जिल्ह्यासाठी घोषणांचा पाऊस पाडला. त्यांनी कोल्हापूर-सांगली जिल्ह्याचा पूर आणि कोल्हापूर विमानतळावर घोषणा केली आहे. 

आज अजित पवार यांनी राज्याच्या एकूण खर्चासाठी ६ लाख ५२२ कोटी रुपयांची तरतूद असलेला अंतरिम अर्थसंकल्प विधानसभेत आज सादर केला. यावेळी त्यांनी, विमान, रस्ते, पूल, सिंचन प्रकल्पांसह अन्य कामांसाठी मोठ्या तरतूदीची घोषणा केली. त्यांनी पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला विळखा घालणाऱ्या पूराववरून देखील घोषणा केली. त्यांनी कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पूर रोखण्यासाठी २३०० कोटी रूपयांची तरतूद करण्यात येत असल्याची घोषणा केली. 

तसेच अजित पवार यांनी कोल्हापूर व सांगलीच्या पूराबाबत ही घोषणा करताना, विदर्भातील सिंचन अनूशेष दूर करण्यासाठी राज्य सरकार काम करत असल्याचे म्हटले आहे. त्यांनी यासाठी २ हजार कोटींची तरतूद केल्याचे म्हटले आहे. 

कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारासाठी भूसंपदान केले जात आहे. ते सुरू असून आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे म्हटले आहे. त्याचबरोबर अमरावती बेलोरा येथील विमानतळाच्या धावपट्टीचे विस्तारीकरणाचे पूर्ण झाले असून येथे रात्रीची विमानसेवा सुरू करण्यासाठी सध्या कामे सुरू आहेत, असेही अजित पवार यांनी म्हटले आहे.

तसेच संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत देवनार येथे “लेदर पार्क” उभारले जाणार असून कोल्हापूर येथे चर्मोद्योग प्रशिक्षण केंद्र तयार केले जाईल. प्रत्येक महसुली विभागात “उत्कृष्टता केंद्रांची” स्थापना करण्यात येईल. यासह गोवंडी येथे बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत चर्मोद्योग प्रशिक्षण केंद्राची उभारणी केली जाईल अशीही घोषणा अजित पवार यांनी केली आहे.

दरम्यान अजित पवार यांनी कुसुमाग्रजांच्या कवितेचे वाचन करून अर्थसंकल्प वाचनाला सुरूवात केली. तसेच त्यांनी हा अंतरीम अर्थसंकल्प पहिल्या चार महिन्यांच्या तरतुदीसाठी असल्याचे नमूद केले. यावेळी त्यांनी, राज्यातील ११ किल्ल्यांचा जागतिक वारसा यादीत समावेश व्हावा यासाठी  युनोस्कोकडे प्रस्ताव पाठवल्याची माहिती दिली आहे. तसेच जुन्नरमध्ये शिवसंग्रहालय उभारणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.

तसेच पीएम कुसुम योजनेअंतर्गत राज्यात १ लाख कृषी पंप बसवण्याचे उद्दिष्ट यंदा असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. तर १ लाख कृषी पंपांच्या उद्दिष्टापैकी ७८ हजार ७५७ पंप बसवण्यात आल्याची माहिती अजित पवार यांनी अर्थसंकल्पात दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : कोकण, घाटमाथ्यावर मध्यम पावसाची हजेरी

Maharashtra Rain Alert : कोकणात मुसळधारेचा इशारा

Onion Kharif Sowing : कांद्याचा पुरेसा स्टाॅक, लागवडीत २८ टक्के वाढ? कांद्याचे भाव नियंत्रणात राहतील असा सरकारचा विश्वास

Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण योजने'त काळाबाजार आढळल्यास थेट कारवाई, पालकमंत्री मुश्रीफांचे पोलिसांना आदेश

Crop Insurance : राज्य सरकार पंतप्रधान पीक विमा योजनेला पर्याय का शोधत आहे ?

SCROLL FOR NEXT