BRS Party  Agrowon
ॲग्रो विशेष

BRS Party : तेलंगणातील योजनांचा ‘बीआरएस’ करणार महाराष्ट्रात प्रचार

Chief Minister K. Chandrasekhar Rao : विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून तेंलगणांचे मुख्यमंत्री कें. चंद्रशेखर राव (केसीआर) यांच्या भारत राष्ट्र समितीने (बीआरएस) महाराष्‍ट्रावर लक्ष केंद्रित केले आहे. तेलंगणात ‘बीएसआर’चे सरकार आहे.

Team Agrowon

Nagar News : विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून तेंलगणांचे मुख्यमंत्री कें. चंद्रशेखर राव (केसीआर) यांच्या भारत राष्ट्र समितीने (बीआरएस) महाराष्‍ट्रावर लक्ष केंद्रित केले आहे. तेलंगणात ‘बीएसआर’चे सरकार आहे.

तेथील सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या योजनांची आणि शेतकरी हिताच्या निर्णयाची माहिती देत महाराष्ट्रात प्रचार करणार आहेत. त्यासाठी विधानसभा मतदार संघापासून गाव पातळीवर कार्यकर्ते आकर्षित करत रणनीती आखली जात आहे. महाराष्ट्राचे समन्वयक दशरथ सावंत यांनी नगरमध्ये याबाबत नुकतेच स्पष्टीकरण दिले.

महाराष्ट्रातील अनेक नेते, कार्यकर्तेही ‘बीआरएस’कडे आकर्षित होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात सर्वच पक्षांच्या नेत्यांची डोकेदुखी वाढणार असल्याचे दिसतेय.

महाराष्ट्राला लागून असलेल्या तेलंगणा राज्यात मुख्यमंत्री केसीआर यांच्या ‘बीआरएस’चे सरकार असून शेतकरी केंद्रस्थानी मानून ते काम करत आहे. तेथे शेतकऱ्यांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवल्या जात आहेत. प्रत्येक गावात पिण्याचे शुद्ध पाणी आहे.

शेतकऱ्यांना वीज मोफत आहे. पेरणीसाठीही एकरी १० हजारांची मदत मिळते. शिक्षणासाठी विविध योजना आहेत. शेतकऱ्यांसाठी विविध योजना आणणारे हे एकमेव मुख्यमंत्री असल्याचा दावा केला जात आहे.

अलिकडच्या काळात ‘बीआरएस’ने नांदेड मार्गे महाराष्ट्रात शिरकाव केला आहे. शेतकरी संघटनेचे माजी अध्यक्ष दशरथ सावंत राज्य समन्वयक आहेत. जिल्ह्यातूनही संभाजी बिग्रेडचे नेते टिळक भोस यांच्यासह काही नेत्यांनी या पक्षत प्रवेश केला आहे.

खासकरून शेतकरी प्रश्नांवर लढणाऱ्या संघटनेचे कार्यकर्ते ‘बीआरएस’मध्ये जात आहेत. मिळणारा प्रतिसाद पाहून ‘बीआरएस’ने महाराष्ट्रात विस्तारवाढ सुरू केल्याचे दोन दिवसांपूर्वीच दशरथ सावंत यांनी नगर येथे बोलताना सांगितले.

शेतकऱ्यांची कशी होळसांड होते यासह तेलंगणा राज्यात शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांच्या माहितीची प्रचार व प्रसार केला जाणार आहे. लोकांच्या प्रतिसादामुळे, त्यांच्या अपेक्षांमुळे पक्षाने महाराष्ट्राकडे लक्ष वेधले असल्याचे राजेश बाठिया यांनी सांगितले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Sugar Factory: राज्यात ७४ साखर कारखान्यांची धुराडी पेटली; पहिल्या सप्ताहात २५ लाख टन गाळप

Rabi Season Preparation: दुष्काळी परिस्थितीत रब्बी हंगामाची तयारी; कृषी विभागाकडून रब्बीचे ६४ लाख हेक्टरवर नियोजन

Paddy Price: गोंदिया जिल्ह्यात धानाच्या दरात तेजी? भाव पोहोचले ४ हजार ५०० रुपयांवर

Agristack Farmer ID: देशात ११ कोटी फार्मर आयडी तयार; पाच महिने आधीच लक्ष्य पूर्ण, कृषिमंत्र्यांची माहिती

Maharashtra Weather: वादळी प्रणालीमुळे विदर्भासह राज्यात पावसाला पोषक हवामान

SCROLL FOR NEXT