BRS Party
BRS Party  Agrowon
ॲग्रो विशेष

BRS Party In Vidarbha : पूर्व विदर्भात वाढतोय ‘बीआरएस’ पक्ष

Team Agrowon

Nagpur News : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (Chief Minister K. Chandrasekhar Rao) यांचा भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्ष पूर्व विदर्भातही नशीब अजमावणार आहे. नागपूर विभागाच्या झालेल्या बैठकीत पूर्व विदर्भातील कार्यक्रमाबाबत रणनीती ठरली.

पक्षाच्या प्रचारासाठी दहा गाणी तयार करण्यात येत असून चार तयार झाल्याचे पक्षाचे पूर्व विदर्भ समन्वयक प्रा. ज्ञानेश वाकुडकर यांनी सांगितले.

बीआरएसची पूर्व विदर्भातील नेत्यांची बैठक रवी भवनात पार पडली. या बैठकीत गडचिरोलीचे माजी आमदार दीपक आत्राम, माजी आमदार वसंत बोंडे यांच्यासह पन्नासावर प्रमुख नेते उपस्थित होते.

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वात राज्याने झपाट्याने प्रगती केली. महाराष्ट्रात तेलंगणाच्या विकासाचा पॅटर्न राबविण्यासाठी बीआरएस पक्ष पूर्व विदर्भातील घराघरांत पोहोचविण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला.

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती एन्ट्री महाराष्ट्रात झाली आहे. यापूर्वी एमआयएमची सुरुवात नांदेडमधूनच झाली होती.

तेलंगणाच्या विकासविषयक जाहिराती मराठवाडा आणि विदर्भात मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध केल्या जात आहेत.

या जाहिरातीच्या माध्यमातून तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांकडून कृषी धोरणांचा प्रसार केला जात आहे. विदर्भात लोकजागर अभियान राबविणारे सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश वाकुडकरांनीही यापूर्वीच मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची भेट घेतली आहे.

विदर्भातील कृषी अभ्यासक विजय जावंधिया यांनी डिसेंबरमध्ये राव यांची भेट घेतली होती. आता विदर्भात बीआरएसचा प्रचार आणि प्रसार करण्याचे काम सुरू झालेले आहे. सद्यःस्थितीत पूर्व विदर्भावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

चंद्रशेखर राव यांच्या शेतकरी कल्याणाविषयी धोरणांमुळे ज्ञानेश वाकुडकरदेखील प्रभावित झाले आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर देशात कुठलेच निर्णय होत नसताना चंद्रशेखर राव यांची धोरणे शेतकऱ्यासाठी फायद्याची असल्याचे वाकुडकरांचे म्हणणे आहे.

राज्यातील सव्वादोनशे मतदार संघांत वाहने फिरवून प्रचार, प्रसार करण्यात येणार आहे. याबाबत नियोजनावर चर्चा करण्यात आली. पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांना जबाबदाऱ्यांचे वाटप करण्यात आले.

बैठकीत डॉ. नीलेश वानखेडे, दगडू पडिले, नागपूर जिल्हा समन्वयक रविकांत खोब्रागडे, वर्धेचे मनीष नांदे, गोंदियाचे अजय खानोलकर, भंडाऱ्याचे मुरलीधर भर्रे, चंद्रपूरचे वमशिकृष्ण अरकिल्ला, बाबाराव मस्के, सागर बत्तुलवार, नाना चव्हाण, ॲड. संतोष कुळमेथे, नीलकंठ काचेवार, किशोर उपासे, दयाराम सहारे, प्रशांत तागडे, बबनराव धुर्वे, नरेश पवनी, आकाशपुरी मुल्तानी, सतीश मडावी, अतुल कांबळे, ब्रजभूषण बैस, प्रशांत ढोले, अजय दारल, राहुल मुन, चेतन काकडे, आकाश सुखदेवे, नंदू मून, अनिल कुमार नागबौध्द, गुणवंत सोमकुंवर, निलेश लोखंडे, पंकज भालेराव, सुरज चिकटे, प्रा. रमेश पिसे, डॉ. त्रिमुल मुन्जाम, शाहरुख खान, संजय बिल्ले, विक्की वैश्नव, चंद्रप्रकाश तरारे, महेंद्र दिवटे उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Climate Change : हवामान बदलाचा फळबागेला जोरदार फटका

Indian Politics : गांधींचा वारसा, मोदींचा आरसा

Delhi Farmers' protest : शेतकरी आंदोलनाचा थर्मल प्लांटला फटका; कोळसा पुरवठा बंद, अनेक रेल्वे गाड्या रद्द

Devgad Hapus : बॉक्स देवगड हापूसचा पण आंबा कर्नाटकचा, ग्राहकांची उघड लूट

Market Trend : बाजारकलासाठी हवामान, नवीन सरकारकडे लक्ष

SCROLL FOR NEXT