Education Agrowon
ॲग्रो विशेष

Education : वीटभट्टीवरील मुले शिक्षणाच्या मुख्‍य प्रवाहात

ठाणे जिल्हा परिषदेतील गठित केलेली समिती या उद्दिष्टांना समोर ठेवून कार्य करणार आहे.

Team Agrowon

Thane News : जिल्ह्यात विविध वीटभट्ट्यांवर अनेक कुटुंबे स्थलांतरित (Migration) होतात व काही महिने काम करतात. वीट्टभट्ट्यांवरील कामामुळे त्या कुटुंबातील लहान मुलांचे शिक्षण (Education) अपूर्ण राहत आहे. ही बाब लक्षात घेता ‘ब्रीक टू इंक’ (Brik To Ink)ही मोहीम राबविण्‍यात येत आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मनुज जिंदल यांनी वीटभट्टीवर काम करणाऱ्या कुटुंबाचे समुपदेशन करून शिक्षणाच्या मूळ प्रवाहात मुलांना आणण्यासाठी ही मोहीम तयार करण्‍यात आली.

वीटभट्टीवरील मुलांना अंगणवाडी, शाळेत सामावून घेणे, जिथे शक्य असेल तिथे निवासी शाळेमध्ये प्रवेश देणे, कुटुंबाची आरोग्य तपासणी करून त्यांना हेल्थ कार्ड देणे, असे उद्देश या मोहिमेंतर्गत ठरविण्यात आले आहे.

वीटभट्टीवर काम करीत असलेल्या कुटुंबातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी करावयाच्या उपाययोजनेबाबत जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय व ग्रामपंचायतस्तरीय समिती गठित केली आहे.

ठाणे जिल्हा परिषदेतील गठित केलेली समिती या उद्दिष्टांना समोर ठेवून कार्य करणार आहे. या मुलांसाठी शिक्षण विभाग, महिला व बालकल्याण विभाग, आरोग्य विभाग, ग्रामपंचायत विभाग व डोअर स्टेप स्कूल फाऊंडेशन, पुणे यांच्या सहकार्याने ‘ब्रीक टू इंक’ मोहिमेचे कार्य सुरू केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Welfare: निघोज फलोद्यान सहकारी संस्थेचा कारभार शेतकरी हिताचा: प्रदीप वळसे

Kusum Solar Pump Complaints: कुसुम सौरपंपांबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी; लाभार्थ्यांसाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन

Panand Road Development: पाणंद रस्त्यांची कामे दर्जेदार करा; सुनेत्रा पवार यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

Fertilizer Dealers Protest: खत विक्रेत्यांचे आंदोलन बेकायदेशीर; कृषी विभागाची भूमिका

Krushimitra Recruitment Scam: कृषिमित्र भरती रॅकेट प्रकरणी फौजदारी कारवाईचे आदेश

SCROLL FOR NEXT