Rahul Gandhi Vs Narendra Modi Agrowon
ॲग्रो विशेष

Loksabha Election 2024 Result : दुपारपर्यंतचा कल! देशात एनडीएच्या मनसुब्याला 'ब्रेक'; इंडियाचा कमबॅक?

१८ व्या लोकसभा निवडणुकांच्या मैदानातून अनपेक्षित निकालाचे कल समोर येत आहेत. एकूण ५४३ जागांचे कल समोर आले आहेत.

Dhananjay Sanap

१८ व्या लोकसभा निवडणुकांच्या मैदानातून अनपेक्षित निकालाचे कल समोर येत आहेत. एकूण ५४३ जागांचे कल समोर आले आहेत. यामध्ये २८७ जागांवर आघाडीवर आहे. तर इंडिया २३९ जागांवर आघाडीवर आहे. तर १७ जागांवर इतर आघाडीवर आहेत. महाराष्ट्रात भाजप ११, शिवसेना (शिंदे) ६, राष्ट्रवादी (अजित पवार) १, कॉँग्रेस ११, शिवसेना (ठाकरे) १०, राष्ट्रवादी कॉँग्रेस (शरद पवार) ८, तर इतर १ जागांवर आघाडी घेतली आहे. महायुतीच्या १९ तर महाविकास आघाडी २८ जागांवर तसेच अपक्ष १ जागेवर आघाडीवर आहेत. त्यामुळे देशपातळीवर अबकी बार ४०० पारच्या मनसुब्यावर पाणी फेरलं गेल्याचं दुपारच्या १.३० वाजेपर्यंतच्या कलावरून दिसतंय.

उत्तरप्रदेशमध्ये झटका-

२०१९ च्या निवडणुकीत भाजपनं उत्तरप्रदेशमध्ये ६३ जागांवर बाजी मारली होती. परंतु आत्तापर्यंतच्या कलानुसार उत्तरप्रदेशमध्ये भाजपला ३२ जागांवर रोखत अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षानं ३७ तर कॉँग्रेसनं ८ जागांवर आघाडी घेतली आहे. त्यामुळं उत्तरप्रदेशमधून भाजपला मोठा धक्का बसला आहे.

जुळवाजुळवी हालचाली सुरू-

आत्तापर्यंतच्या कलानुसार भाजपने २४५ जागांवर आघाडी घेतली आहे. तर कॉँग्रेसने ९९ जागांवर आघाडी घेतली आहे. परंतु सत्ता स्थापनेसाठी २७२ आकडा पार करावा लागणार आहे. त्यामुळे एनडीए आणि इंडियानं घटक पक्षासोबत चर्चा करण्यासाठी सुरुवात केली आहे. बिहारमध्ये नितीश कुमार तर आंध्रप्रदेशमध्ये चंद्रबाबू नायडू यांच्या दोन्ही बाजूने संपर्क करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा सुरू झाली आहे. परंतु अजून अंतिम निकाल हाती आले नाहीत. दुपारी ४ पर्यंत चित्र अधिक स्पष्ट होईल.

महाराष्ट्रात आघाडीवर कोण?

अहमदनगरमधून महायुतीचे सुजय विखे यांनी ११ हजार ६९ मतांनी आघाडी घेत निलेश लंके यांना पिछाडीवर टाकलं आहे. अकोल्यात आघाडीचे अभय पाटील यांनी अनुप धोत्रे यांना १५ हजार ७३१ मतांनी पिछाडीवर टाकलं आहे. बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांनी १५ हजार ९५१ मतांची लीड घेतली आहे. तर सुनेत्रा पवार पिछाडीवर आहेत. बीडमध्ये काटे टक्कर पाहायला मिळत आहे. महायुतीच्या पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे यांच्या लढत रंगली आहे. पंकजा मुंडे २४९ मतांनी आघाडीवर आहेत.

बुलढाणामध्ये महायुतीचे प्रतापराव जाधव १४ हजार ७१७ मतांनी नरेंद्र खेडेकर यांच्या पुढे आहेत. तर दिंडोरीमध्ये महाविकास आघाडीचे भास्कर भगरे यांनी ६४ हजार १८६ मतांनी आघाडी घेत भारती पवारांनी पिछाडीवर टाकलं आहे. हतकणंगले मतदारसंघात महाआघाडीचे सत्यजीत पाटील आणि धैर्यशील माने यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. पाटील यांना १ हजार ७७ मतांची आघाडी आहे. पुणे येथील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहळ ४६ हजार ४६ मतांनी आघाडीवर आहेत. नाशिकमध्ये महाआघाडीचे राजाभाऊ वाजे यांनी २७ हजार ९५० मतांची आघाडी घेत महायुतीचे हेमंत गोडसे यांना पिछाडीवर टाकलं आहे.

लातूरमध्ये २८ हजार २७६ मतांनी महाआघाडीचे काळगे आघाडीवर आहे. तर साताऱ्यात शशिकांत शिंदे यांनी उदयनराजे यांना १ हजार ४२७ मतांनी पिछाडीवर टाकलं आहे. धारशिवमध्ये ओमप्रकाश राजे निंबाळकरांनी १ लाख ५२ हजार ४९१ मतांची आघाडी घेतली आहे. तर सोलापूरमधील महायुतीच्या प्रणिती शिंदे यांनी २१ हजार ८३७ आघाडी घेत महायुतीचे राम सातपुते यांना पिछाडीवर टाकलं आहे.

तसेच शिरूरमध्ये अमोल कोल्हे यांनी ४६ हजार २८५ मतांची आघाडी घेतली आहे. तर महाआघाडीचे संजय देशमुख यांनी महायुतीच्या राजश्री पाटील यांना ५० हजार ६६४ मतांनी मागे टाकलं आहे. वर्धा मतदारसंघात महाआघाडीचे अमर काळे यांनी १ लाख ६४ हजार ६०२ मतांची आघाडी घेतली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Diwali Article: माचीवरला शंकर...

Saptashrungi Devi Darshan: सप्तशृंगीमातेचे मध्यरात्रीपर्यंत मिळणार दर्शन

Model Village: भेंड गावानं बांधलं प्रगतीचं, विकासाचं तोरण !

Agrowon Diwali Article: अवघाचि संसार सुखाचा करीन

NITI Aayog: देशातील समुद्री मासेमारीच्या विकासासाठी नीती आयोगाचा अहवाल; स्वतंत्र योजना आणि धोरणांची शिफारस

SCROLL FOR NEXT