Sangli News : बाजार समितीत आलेला हळद, बेदाणा यांसह अन्य शेतीमाल आकर्षक पॅकिंग करून ब्रेड करून परदेशात विक्री करण्यासाठी नेटवर्क उभारण्यासाठी त्यासाठी बाजार समिती आणि व्यापाऱ्यांनी पुढाकार घ्यावा. तसेच सेंद्रिय शेती करण्यासाठी बाजार समितीने शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यावे, असे मत खासदार विशाल पाटील यांनी व्यस्त केले.
सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अमृत महोत्सवी वर्षाचा प्रारंभ शुक्रवारी (ता. १७) झाला. या वेळी ऑनलाइन सेवा आणि बाजार समितीच्या वेबसाईटचे उद्घाटन झाले. या वेळी माजी मंत्री, अजितराव घोरपडे, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील, सभापती सुजय शिंदे, उपसभापती रावसाहेब पाटील, सचिव महेश चव्हाण, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अमरसिंह देसाई, बाजार समितीचे संचालक, कर्मचारी, व्यापारी, उपस्थित होते.
खासदार विशाल पाटील म्हणाले, ‘‘स्व. वसंतदाद पाटील यांनी बाजार समितची निर्मिती केली. संचालक मंडळ, आणि व्यापारी यांनी बाजार समितीचा विस्तार केला. बाजार समितीत चुकाही घडल्या.
चुका घडून सुद्धा ही बाजार समिती आजही भक्कमपणे उभी आहे. बाजार समिती एक शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाच आहे. त्यामुळे हळद, गूळ, बेदाणा यासाठी नवा आराखडा तयार करण्याची गरज आहे. या माध्यमातून हळद, गूळ, बेदाणा, यांसह प्रतवारी, पॅकिंग आणि ब्रँड करून विक्री होण्याची गरज आहे. त्यासाठी सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे.’’
बाजार समितीत राजकारणाचा परिणाम मात्र निश्चित जास्त आहे. राजकारणामुळे बाजार समितीत कमिटीत होणारी उलाढाल किंवा व्यापार बदलला. पुढच्या काळात बाजार समितीकडून शेतकरी, व्यापाऱ्यांच्या अपेक्षा बदणार आहेत. पुढच्या काळात शेतकरी डोळ्यासमोर ठेवूनच या मार्केट कमिटीचा काम करावे. नवीन नवीन यंत्रणा येत आहेत त्या सगळ्याचा अभ्यास करण्याची गरज आहे.- अजितराव घोरपडे, माजी मंत्री म्हणाले
बाजार समितीचे उपन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. डाळिंब, द्राक्ष रासायनिक अंश विरहीत उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांना बांधावर मार्गदर्शन करण्याचे नियोजन आहेसुजय शिंदे, सभापती
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.