Dr Sharad Gadakh Agrowon
ॲग्रो विशेष

AI in Agriculture: शाश्वत शेतीमध्ये ‘एआय’च्या वापरातून संशोधनाला चालना

Agricultural Innovation: शाश्वत शेतीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, भारतीय मानक ब्यूरो आणि राजाराम बापू पाटील तंत्रज्ञान संस्था यांच्यात महत्त्वपूर्ण सामंजस्य करार झाला आहे. या करारामुळे आधुनिक शेतीसाठी संशोधन व प्रयोगशील प्रकल्पांना गती मिळणार आहे.

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Ahilyanagar News : भारतीय मानक ब्यूरो आणि इस्लामपूर येथील राजाराम बापू पाटील तंत्रज्ञान संस्था यांच्यामधील सामंजस्य करार शेतकरी व विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहेत. भारतीय मानक ब्यूरो यांच्या सामंजस्य करारामुळे संशोधित तंत्रज्ञानाचे मापदंड ठरविण्यास मदत होईल. शाश्वत शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरासंबंधी संशोधनाला चालना मिळणार असल्याचे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी सांगितले.

महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा केंद्र शासनाच्या पुणे येथील भारतीय मानक ब्यूरो व इस्लामपूर येथील राजाराम बापू पाटील तंत्रज्ञान संस्था यांच्याबरोबर सामंजस्य करार करण्यात आला. या वेळी कुलगुरू डॉ. शरद गडाख, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के, पुणे येथील भारतीय मानक ब्यूरोचे संचालक डॉ. एस. डी. राणे, उपसंचालक अक्षय कुटे, इस्लामपूर येथील राजाराम बापू तंत्रज्ञान संस्थेचे प्रमुख डॉ. एम. व्ही. पिसाळ, संशोधन व विकास विभागाचे समन्वयक डॉ. एस. डी. पाटील, पदव्युत्तर व आचार्य विभागाचे संयोजक डॉ. एस. एस. गावडे, डॉ. पी. बी. देसाई, अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विभाग प्रमुख डॉ. विक्रम कड व विद्यापीठाचे नोडल अधिकारी डॉ. एम. आर. पाटील उपस्थित होते.

कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी सांगितले की, कृषी विद्यापीठाने ५७ वर्षांत ३०६ सुधारित वाण, १८६६ तंत्रज्ञान शिफारशी व ५१ कृषी यंत्र अवजारे विकसित केले आहेत. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी व भारतीय मानक ब्यूरो यांच्यामधील झालेल्या सामंजस्य करारानुसार शेतकरी व शेतकरी उत्पादक संघ, विद्यार्थी व संशोधक यांच्यासाठी कृषी क्षेत्राशी संबंधित आधुनिक कृषी प्रात्यक्षिक फार्म स्थापन करणे हा असून एकत्रितपणे प्रशिक्षणे व कमी कालावधीचे प्रात्यक्षिके, प्रशिक्षणे व सेमिनार आयोजित करण्यात येणार आहेत.

डॉ. विठ्ठल शिर्के यांनी विद्यापीठाच्या वतीने तर भारतीय मानक ब्यूरोचे संचालक डॉ. एस. डी. राणे व राजाराम बापू तंत्रज्ञान संस्थेचे प्रमुख डॉ. एम. व्ही. पिसाळ यांनी स्वाक्षऱ्या केल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विक्रम कड यांनी केले तर डॉ. बाबासाहेब भिटे यांनी आभार मानले.

सामंजस्य कराराचा हेतू

या सामंजस्य करारानुसार ड्रोन तंत्रज्ञानाच्या साह्याने पिकांचे सर्वेक्षण करणे, काटेकोर शेती, स्वयंचलित पाणी व्यवस्थापन, अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर, काढणी पश्चात तंत्रज्ञान, माती व पाणी व्यवस्थापन, शेतीसाठी यंत्र मानवाचा वापर तसेच कृषी क्षेत्रातील टाकाऊ पदार्थांचा पुनर्वापर, प्रक्रियायुक्त कृषी मालाची प्रत सुधारणे, अन्न प्रदार्थांची गुणवत्ता टिकविण्यासाठी उष्णतेचा वापर, पर्यावरणास अनुकूल अशा पुनर्वापर व विघटनशील घटकांचा वापर या संबंधीचे संशोधन करणे हा या सामंजस्य कराराचा हेतू आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MAGNET Project: शेतमालाचे मुल्यवर्धन, साठवणूक क्षमता वाढीसाठी साहाय्य; ९३ कोटी निधी मंजूर

Fake Seeds: बनावट बियाणे विक्रीला जरब

Farm Road Crisis: शेतरस्त्यासाठी शेतकरी पितापुत्राचा आत्मदहनाचा प्रयत्न

Water Conservation: जलस्रोतांसाठी व्यापक उपाययोजना करा

PM Kisan Scheme: ‘पीएम किसान’साठी ‘ॲग्रीस्टॅक’ बंधनकारक

SCROLL FOR NEXT