Bollworm Agrowon
ॲग्रो विशेष

Bollworm Control : बोंड अळी नियंत्रणासाठी फरडद निर्मूलन आवश्यक

Fardad Elimination : ‘‘गुलाबी बोंड अळीचे जीवनचक्र खंडित करून पुढील हंगामातील प्रादूर्भाव टाळण्यासाठी कापूस पिकाच्या फरदडीचे निर्मूलन करावे,’’ असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना केले.

Team Agrowon

Akola News : ‘‘गुलाबी बोंड अळीचे जीवनचक्र खंडित करून पुढील हंगामातील प्रादूर्भाव टाळण्यासाठी कापूस पिकाच्या फरदडीचे निर्मूलन करावे,’’ असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना केले.

किरवे म्हणाले, ‘‘यंदाचा खरीप हंगामात पेरणी उशिरा झाल्याने सध्या कापूस पीक हंगाम अंतिम टप्यात आहे. अधिक उत्पादनासाठी काही ठिकाणी कापसाची फरदड घेण्याची शक्यता आहे. फरदडीमुळे गुलाबी बोंड अळीचे जीवनचक्र वर्षभर सुरू राहते. उपाययोजना म्हणून फरदड निर्मूलन करणे हा कपाशी पिकामध्ये महत्त्वाचा भाग आहे.’’

...अशा करा उपाययोजना

प्रादुर्भाव पुढील वर्षाच्या हंगामात वाढण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे कापसाची तिसरी वेचणी झाल्यानंतर म्हणजेच डिसेंबर ते जानेवारीनंतर कापूस पीक काढून घ्यावे

कापसाची शेवटची वेचणी झाल्यानंतर चरण्यासाठी बकऱ्या, गायी, इतर जनावरे सोडावीत - जनावरांनी प्रादुर्भाव युक्त बोंडे खाल्ल्यामुळे ७० टक्क्यांपर्यंत बोंड अळीचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते

पऱ्हाट्याचा शेतात ढीग रचून ठेवू नये

काढलेल्या पऱ्हाट्यांचे कंपोस्ट खत बनविण्यावर भर द्यावा.

गुराढोरांनी चरल्यानंतर कापूस श्रेडर मशिनने उभे कापसाचे पीक जमिनीत तुकडे करून दाबून टाकावे

गाडलेल्या ठिकाणी स्पिंकलरने सौम्य पाणी देऊन त्यावर कचरा करण्यासाठी ट्रायकोडर्मा द्रावणाची फवारणी करावी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Padma Shri Award: प्रजासत्ताक पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा; महाराष्ट्राच्या चार व्यक्तींना पद्मश्री पुरस्कार जाहीर

Labor Supply Scam: ऊसतोड मुकादमांकडून वाहनधारकांची फसवणूक

Poison Free Farming: विषमुक्त शेतीचा मंत्र घरोघरी पोहोचवा : मंत्री नरहरी झिरवाळ

Jal Jeevan Mission: जलजीवन योजनेचे पाणी लोकांना मिळणार तरी कधी?

Worker Shortage : शेतकऱ्यांचा मजुरीवर खर्च वाढला आहे का?

SCROLL FOR NEXT