Election Agrowon
ॲग्रो विशेष

Buldana Apmc Election Update : बुलढाण्यात बाजार समितीची रंगत वाढली, माजी सभापतींनी केली होती बोगस मतदार नोंदणी

Team Agrowon

Buldana News : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे (Agriculture Produce Market Committee) वातावरण कमालीचे तापले आहे. उमेदवारी अर्ज नामंजूर झाल्याने माजी सभापती जालिंदर बुधवत यांनी पत्रकार परिषद घेत सत्तारुढ पक्षावर आरोप केले होते.

तर, भाजपचे तालुकाध्यक्ष सुनील देशमुख यांनी पत्रकार परिषदेत बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांना हाताशी धरून बोगस मतदार नोंदणी माजी सभापती जालिंदर बुधवत यांनी केल्याचा आरोप केला आहे.

बाजार समितीची निवडणूक डोळ्यापुढे ठेवून त्यांनी बाजार समितीच्या सर्व जागा हडपण्याचा प्रयत्न केल्याचेही देशमुख म्हणाले.

देशमुख यांनी रविवारी (ता. नऊ) पत्रकार परिषद घेतली. यावेळी बुलडाणा तालुकाध्यक्ष असलेले देशमुख यांच्यासह शिवसेना (शिंदे गटा)चे जिल्हा प्रमुख ओमसिंग राजपूत, धनंजय बारोटे, भाजपाचे ॲड. मोहन पवार, अजय बिल्लारी आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना देशमुख म्हणाले, की कायद्याच्या चौकटीत राहून व संविधानातील तरतुदीनुसार बाजार समिती माजी सभापती आणि उद्धव ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांच्यासह सात जणांचे उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने अपात्र ठरवले.

याबाबत या प्रक्रियेबाबत कुठलीही कायदेशीर माहिती न घेता बुधवत यांनी बेताल वक्तव्य केले आणि चुकीची माहिती प्रसार माध्यमांना पोहोचून जनतेची दिशाभूल केली.

हमाल मापारी मतदार संघातील २५५ मतदारांपैकी १५७ मतदार हे तत्कालीन सभापती संचालक मंडळ तसे विद्यमान प्रशासन व संचालक यांच्या गावचे आहेत.

अडते व्यापारी मतदारसंघातील बोगस मतदारा मतदारांमध्ये सोयगाव पांगरखेड मध्ये ७७, मासरूळमध्ये ३०, कुंभेफळ मध्ये २४, वरुड ११, जामठी ९ आणि पांगरीमध्ये ९ मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे.

ही बाब लक्षात आल्यानंतर यावर आम्ही आक्षेप घेतला व कायद्याच्या चौकटीत राहून यापैकी काही लोकांनी भरलेले अर्ज बाद करण्याची विनंती निवडणूक प्रक्रिया राबवण्याकडे केली होते. बुधवत हे बाजार समितीच्या विकासाची गोष्ट करतात, मात्र बाजार समितीचे कर्मचाऱ्यांचे पगार सहा महिन्यांपासून थकीत आहे.

याशिवाय बाजार समितीमध्ये झालेले गाळे बांधकाम करून ते विकल्यानंतर मिळालेला १२ ते १३ कोटी रुपयांचा निधी कुठे खर्च केला, याचे उत्तर मात्र त्यांच्याकडे नाही, असेही देशमुख म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Silk And Milk Project : परभणी जिल्ह्यातील ९ गावांमध्ये सिल्क आणि मिल्क प्रकल्प

Paddy Crop Damage : पावसामुळे तळामध्ये भात जमीनदोस्त

Ration Grain : रेशन धान्य वाटपात सोलापूर राज्यात प्रथम

Orchard Cultivation : जलकुंड आधारित फळबाग लागवड वरदान

Grape Producer : द्राक्ष बागायतदारांच्या समस्या सोडवा

SCROLL FOR NEXT