Mango Blossom Agrowon
ॲग्रो विशेष

Mango Blossom : आंब्याच्या झाडांना मोहर फुटू लागला

Mango Flowering Season : मुळशी तालुक्यात सध्या कडाक्याची थंडी पडत आहे. त्याचा परिणाम होऊन आंब्याच्या झाडांना मोहर फुटत आहे. शेतकरी मोहरासाठी थंडीची वाट पाहत होते

Team Agrowon

Pune News : मुळशी तालुक्यात सध्या कडाक्याची थंडी पडत आहे. त्याचा परिणाम होऊन आंब्याच्या झाडांना मोहर फुटत आहे. शेतकरी मोहरासाठी थंडीची वाट पाहत होते. यंदा चांगल्या उत्पन्नाची आशा आहे. तालुक्यात आठ दिवसांपासून चांगली थंडी पडत आहे.

आंब्याच्या झाडांना मोहर फुटण्यासाठी थंडीची गरज असते. सध्या केसर आंब्याच्या झाडांना मोहोर फुटत आहे. या जातीच्या झाडांना लवकर मोहर येत असतो. त्यामुळे तालुक्यातील केसर आंब्याचा हंगाम एप्रिल व मे महिन्यामध्येच मिळू शकेल.

तसेच हापूस, पायरी व रायवळ झाडांना उशिरा मोहर फुटत असतो. त्यामुळे तालुक्यातील या जातीच्या फळांचा हंगाम मे व जूनमध्ये सुरू होतो. केसरचे फळ लवकर येते. त्यामुळे त्याला चांगला भाव मिळतो.

तसेच खाण्यास चव चांगली असल्यामुळे हापूसच्या बरोबरीने दर मिळतो. झाडाची उंची कमी असते. त्यामुळे फळ काढणी, कीटकनाशके फवारणी करणे सोयीचे होते. लागवडीपासून दोन ते तीन वर्षांत उत्पादन सुरू होते. त्यामुळे तालुक्यात केशर आंब्याची लागवड करण्याकडे शेतकरी मोठ्या प्रमाणावर वळले आहेत.

केसर आंब्याचा हंगाम लवकर येणार.

पायरी व रायवळ झाडांना उशिरा मोहर.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Farmer Scheme: ५० शेळ्या, ५ बोकडांसाठी ८.५ लाखांपर्यंत अनुदान! ग्रामीण शेतकऱ्यांसाठी सरकारची योजना; जाणून घ्या सविस्तर माहिती

Mango Season: तुम्हाला तुमच्या झाडाचे आंबे खायचे आहेत का...

Traditional Food Culture: वरण-भात आणि खाद्यसंस्कृती

Women in Agriculture: स्त्रियांच्या अधिकाराला अंधश्रद्धेचा विळखा

Interview with Dr Jitendrakumar Kadam: महाराष्ट्रातील हळदीला जागतिक संधी

SCROLL FOR NEXT