Vinesh Phogat| Omar Abdullah | Bhupinder Singh Hooda| Nayab Singh Saini Agrowon
ॲग्रो विशेष

Haryana Election 2024 : हरियाणात भाजप तर जम्मू अन् काश्मीरमध्ये जेकेएनसी, कॉँग्रेस आघाडीवर

Haryana Assembly Election Results : हरियाणा आणि जम्मू काश्मीरमधील विधानसभेच्या निवडणुकीच्या मतमोजणीला मंगळवारी (ता.८) सुरूवात झाली आहे. सकाळच्या कलानुसार हरियाणामध्ये कॉँग्रेस पुढे होती. परंतु, १० वाजता मात्र भाजपनं जोरदार मुसंडी मारली.

Dhananjay Sanap

Haryana News: हरियाणा आणि जम्मू काश्मीरमधील २०२४ च्या विधानससभा निवडणुकीच्या मतमोजणीला मंगळवारी (ता.८) सुरूवात झाली आहे. सकाळच्या कलानुसार हरियाणामध्ये कॉँग्रेस पुढे होती. परंतु, १० वाजता मात्र भाजपनं जोरदार मुसंडी मारली. हरियाणामध्ये भाजप विजयाच्या दिशेनं वाटचाल करत असल्याचं दिसत आहे. सकाळी ११.३० वाजता भाजपने ९० पैकी ४८ जागांवर आघाडी घेतली आहे. तर कॉँग्रेस ३६, भारतीय राष्ट्रीय लोकदल १ आणि बहुजन समाज पार्टी १ आणि अपक्ष ४ जागांवर आघाडीवर आहेत. परंतु भाजपकडे आघाडी असली तरी त्यातील १० जागांवरील उमेदवारांची आघाडी ५०० ते २ हजारच्या घरात आहे. त्यामुळे भाजप आणि कॉँग्रेसमध्ये लढत रंगलेली दिसत आहे.

जम्मू काश्मीरमध्ये मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स (जेकेएनसी) आणि कॉँग्रेसचं पारडं जड राहिलं आहे. ११.३० वाजेपर्यंतच्या कलानुसार ९० पैकी ४१ जागा जेकेएनसी तर कॉँग्रेस १० जागांवर आघाडीवर आहे. तर २६ जागांवर भाजप आघाडीवर आहे. पीपल्स डेमोक्रेटिक पार्टी ४, पीपल कॉन्फरन्स २, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी) १ आणि अपक्ष ६ जागांवर आघाडीवर आहे.

ॲग्रो विशेष

दरम्यान, हरियाणामध्ये मागील १० वर्ष भाजपच्या हाती सत्ता आहे. तर जम्मू आणि काश्मीरमध्ये १० वर्षांनंतर पहिल्यांदाच निवडणूक होत आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये १८ सप्टेंबर, २५ सप्टेंबर आणि १ ऑक्टोबर असे एकूण तीन टप्प्यात मतदान झाले. तर हरियाणामध्ये ५ ऑक्टोबर रोजी एक टप्प्यात मतदान पार पडले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing : सातारा जिल्ह्यात खरीप पेरणी अंतिम टप्प्यात

Farmer Felicitation : ‘सीसीआरआय’च्या वर्धापन दिनी प्रयोगशील शेतकऱ्यांचा गौरव

Melghat Water Scarcity : मेळघाटच्या पाणीटंचाईला ब्रेक

Nanded Water Stock : नांदेडमधील पाणीसाठा ३१ दलघमीने वाढला

Automated Weather Station : सांगलीत स्वयंचलित हवामान केंद्रासाठी ६९६ गावांत चाचपणी

SCROLL FOR NEXT