Chandrshekhar Bavankule Agrowon
ॲग्रो विशेष

Chandrashekhar Bawankule : राज्यातील शेतकऱ्यांवर सर्वात जास्त अन्याय पवारांनी केला; बावनकुळेंचा हल्लाबोल

Lok sabha Election 2024 : राज्यात निवडणुकीच्या रणधूमाळीत भाजप आणि ठाकरे गटात जुंपली असतानाच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : महाराष्ट्रातील राजकारण लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींमुळे चांगलेच गरम होत आहे. सध्या भाजप आणि ठाकरे गटात जुंपली असतानाच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. रविवारी (ता.२१) बावनकुळे यांनी नागपूर येथे पत्रकार परिषदेत बोलताना पवारांसह माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. 'राज्यातील शेतकऱ्यांचे सर्वाधिक नुकसान आणि अन्याय हे पवारांनी केला', असे बावनकुळे यांनी म्हटले आहे. यावरून आता आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांच्यावर शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी शेती प्रश्नावरून टीका केली होती. यावरून बावनकुळे यांनी पवारांवर निशाना साधताना, 'शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत असे आम्हाला वाटते. यासाठी भाजप काम करत आहे. मात्र शरद पवार कृषीमंत्री असताना शेतकऱ्यांच्या हिताचे काम झाले नाही. त्यांच्या कार्यकाळात कधीही शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव मिळाला नाही. शेतकऱ्यांना वेळेवर खते, वीज मिळाली नाही,' असा आरोप केला आहे.

'मात्र पवारांच्या कार्यकाळात महाराष्ट्र कृषी क्षेत्रात मागे गेला. त्यावेळी महाराष्ट्र दहाव्या क्रमांकावर फेकला गेला होता. पण आता पंतप्रधान मोदी शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहेत. शेतकऱ्यांना मजबूत करण्याची गँरटी पंतप्रधान मोदी यांनी दिली आहे. यामुळेच पवार आता शेतकऱ्यांच्या हिताची गोष्टी करत आहेत. त्यांच्याच काळात शेतकऱ्यांवर सर्वाधिक अन्याय झाला. पवारांनी शेतकऱ्यांवर सर्वात जास्त अन्याय केला. यामुळे आता पवारांनी शेतकऱ्यांबाबत पुळका आल्याचे दाखवू नये,' असा टोला बावनकुळे यांनी पवार यांना लगावलाय.

बावनकुळे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना, 'देशातील सर्वाधिक निष्क्रिय मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचा टॉपचा नंबर असेल. तर देवेंद्र फडणवीस हे लायक व्यक्तीच्या यादीत टॉपवर असतील. ठाकरे यांनी पवार व काँग्रेस यांची सोबत घेऊन आपला जनाधार संपविला. त्यांच्या सभेला कोणच जाण्यास तयार नसून या निवडणूकीनंतर ते घरीच बसतील', असे म्हटले आहे.

सध्या ठाकरे यांची मानसिक स्थिती ढासळली असून ते 'मनोरुग्णासारखे वागत आहेत. यामुळे त्यांना इस्पितळात दाखल करण्याची गरज असून आदित्य ठाकरे फक्त एका मतदारसंघात निवडून आले. मंत्री होण्याची त्यांची पात्रता तरी होती का?', असा सवाल बावनकुळे यांनी केला. तसेच 'ठाकरे यांना विकासावर बोलता येत नसून ते जनतेला संभ्रमात टाकत आहेत. ठाकरे कुणीतरी लिहून दिलेली स्क्रीप्ट वाचायचे काम करतात. त्यांचे आता हेच काम राहिले आहे. यामुळे ठाकरेंनी आत्मचिंतन करावे', असा टोला बावनकुळे यांनी लगावला आहे.

याआधी बावनकुळे यांनी पवार यांच्यावर राम मंदिराच्या टीकेवरून ट्विट करत हल्लाबोल केला होता. पवारांना सीतामाईंबद्दल बोलणे, कळवळा व्यक्त करणे म्हणजेच ढोंगीपणाचा कळसच असल्याचे म्हटले होते. तसेच घरातील सुनेला बाहेरची म्हणून हिणवणाऱ्यांना सीतामाईंबद्दल कळवळा कसा? अशी खोचक टीका बावनकुळे यांनी केली होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahua Processing Business : गोडवा मोहफुलांच्या लाडवांचा

Beekeeping Business : तरुण उद्योजक मित्रांची अमृत मध निर्मिती

Land Circular: भोगवटादार वर्ग-२ जमिनींसाठी परिपत्रक

Soil and Water Engineering: मृदा, जलसंवर्धनामध्ये अभियांत्रिकी तंत्राचा वापर

Farmer Injustice: शेतकरी नावडे सर्वांना

SCROLL FOR NEXT