BJP's Manifesto Agrowon
ॲग्रो विशेष

BJP's Manifesto : कर्जमाफी, भावांतर योजनेसह शेतकऱ्यांवर भाजपच्या जाहीरनाम्यात आश्वासनांचा पाऊस

BJP's Manifesto On Maharashtra Assembly Election 2024 | राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने रविवारी (ता. १०) संकल्पपत्र (जाहीरनामा) जाहीर केला.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय नेते तथा केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या हस्ते रविवारी (ता.१०) पक्षाचे संकल्पपत्र म्हणजेच जाहीरनामा मुंबईत जाहीर करण्यात आला. यावेळी केंद्रीय मंत्री पियुष गोयल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार यांसह भाजपचे अनेक नेते उपस्थितीत होते.

राज्यात प्रचाराने रण चांगलेच तापले असून २० तारखेला मतदान होणार आहे. प्रचारासाठी फक्त १० दिवस उरले आहेत. याआधी भाजपने संकल्पपत्रातील २५ संकल्प जाहीर केले.

शेतकऱ्यांचा सन्मान करण्याचं आमचे आश्वासन

यावेळी अमित शाह यांनी, गरीब, महिला आणि शेतकऱ्यांचा सन्मान करण्याचं आश्वासन आम्ही दिले आहे. अराजकता फैलावणाऱ्यांना आम्ही दूर केलं असून आमचे संकल्पपत्र महाराष्ट्राला मजबूत करणारे आहे. आघाडीला फक्त सत्ता हवी असून विचारधारेशी त्यांना घेणंदेणं नाही. त्यांचे मनसुबे तुष्टीकरणाचे आहेत, असा टोला अमित शाह यांनी म्हटले आहे.

शरद पवार यांनी राज्यासाठी काय केलं?

महाराष्ट्रात पहिले एआय विद्यापीठ बांधले जाईल. पाच वर्षांत २५ लाख तरुणांना रोजगार दिले जाईल. वृद्धापकाळातील निवृत्ती वेतन २१०० रुपये करण्यात येणार आहे. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी अनेक मोठ्या योजना हाती घेण्यात येणार आहेत. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार आहोत. धर्मांतर रोखण्यासाठी कठोर कायदे आणले जातील. पण राज्यात आघाडीचे सरकार आल्यास राज्य पुन्हा मागास होईल. शरद पवार यांनी दिलेली आश्वासने वास्तवापासून दूर आहेत. शरद पवार यूपीएमध्ये मंत्री होते, त्यांनी राज्याच्या विकासासाठी काय केलं? असा सवाल देखील शाह यांनी केला आहे.

एक पवित्र दस्ताऐवज : फडणवीस

आमच्यासाठी हे संकल्पपत्र म्हणजे कागदाचे डॉक्युमेंट नसून एक पवित्र दस्ताऐवज असून राज्यासाठी आमचे व्हिजन असल्याचे फडणवीसांनी म्हटले आहे. तर आम्ही पंतप्रधान नेरेंद्र मोदी यांच्या व्हिजनकडे प्रेरणेने काम करत असून महाराष्ट्रात संकल्पपत्रातून काम करू. तर आज दुपारी एक स्थगिती पत्र काढले जाणार अशी टीका महाविकास आघाडीच्या येणाऱ्या जाहीरनाम्यावर फडणवीस यांनी केली आहे. तसेच मविआला केवळ चालणाऱ्या प्रकल्पांना स्थगिती देण्यास रस असून जनतेचा विश्वास महायुतीवर आहे. भाजपवर असल्याचेही फडणवीस यांनी म्हटले आहे.

भाजपच्या संकल्पपत्रातील महत्वाच्या घोषणा

शेतकऱ्यांना कर्जमाफी

शेतकऱ्यांसाठी भावांतर योजना

शेतकऱ्यांसाठी मूल्यसाखळी बनवण्याचा प्रयत्न

शेतकऱ्यांना खतांच्या खरेदीनंतर जीएसटीचा परतवा

शेतकरी सन्मान योजनेतून वर्षाला १२ हजार वरुन १५ हजार

लाडकी बहीण योजनेत महिलांना १५०० रुपयांऐवजी २१०० रुपये

भाजपच्या संकल्पपत्रातील महत्वाच्या घोषणा

प्रत्येक गरीबाला अन्ननिवाऱ्याचे नियोजन

जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती स्थिर ठेवणार

वृद्ध पेन्शन योजनेची वाढ. आता दीड हजार ऐवजी २१०० रुपये करणार

२५ लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य

१० लाख विद्यार्थ्यांना विद्यावेतन देणार

सौर आणि अक्षय योजनेतून गरीब मध्यम वर्गीयांना वीज

भाजपच्या संकल्पपत्रातील महत्वाच्या घोषणा

राज्याला एआयमध्ये अव्वल करणार

एरोनांनिक्स आणि स्पेसमध्ये उत्पादनाची राज्यात संधी निर्माण करणार

राज्यात ५० लाख लखपतीदीदी तयार करण्याचा मानस

राज्यात कौशल्य जनगणना करणार

नव उद्योजकांना १५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज

युवांसाठी स्वामी विवेकानंद फिटनेस कार्ड

गडकिल्लांसाठी प्राधिकरण

ज्येष्ठ नागरिकांसाठी सेवा धोरण

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pimpalgaon Joge Canal : पिंपळगाव जोगे धरणाच्या कालव्याची दुरवस्था

Sharad Pawar : राज्यात कोणी दाब दडपशाही करत असेल तर ते खपवून घेणार नाही : शरद पवार

Cotton Market : बारामती बाजार समितीत शनिवारपासून कापूस विक्री

Devendra Fadnavis : आमचे सरकार आले तर पूर्ण कर्जमाफी देणार : फडणवीस

Cooperative Development Project : सहवीजनिर्मिती प्रकल्प फायदेशीर

SCROLL FOR NEXT