Water Pollution Agrowon
ॲग्रो विशेष

Bird Habitat Issue : नाशिकच्या दूषित पाण्याने पक्ष्यांचा अधिवास धोक्यात

Team Agrowon

Niphad News : जागतिक दर्जाचे पाणथळ क्षेत्र असलेल्या नांदुरमध्यमेश्वर पक्षी अभय आरण्य क्षेत्रातील नांदूरमधमेश्वर धरणाच्या मागील बाजुस कोठुरे.करंजगाव.चापडगाव, काथरगाव या भागात दूषित पाण्यामुळे शेकडो मासे मृत झाले आहे. नाशिक शहरातील वाढत्या दूषित पाण्यामुळे नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यातील पक्ष्यांचे अधिवासावर परिणाम होणार आहे.

निफाड तालुक्यातील गोदावरी आणि कादवा नदीवर नांदूर मधमेश्वर धरण आहे याच धरणावर ती नाशिक नगर आणि मराठवाडा या तीन जिल्ह्यातील प्रमुख शहरांना नांदूर मधमेश्वर डावा व उजवा कालवा तसेच मराठवाडा एक्सप्रेस कालवा यातून पाणी पुरवठा केला जातो तसेच या धरणाच्या पाण्यावरती नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्यातील पक्षी आणि जलचर देखील अवलंबून आहे.

नाशिक महापालिका क्षेत्रातील सांडपाणी थेट नदीपात्रात येत असल्याने गोदावरी प्रदूषित झाली आहे त्यामुळे निफाड तालुक्यातील जवळपास ३० ते ४० किलोमीटर नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पानवेलीची साम्राज्य पसरले आहे.

या पाने वेली मुळे नदीचे पाणी दूषित झाली आहे त्यामुळे नदीपात्रात असलेल्या जलचरांचे अस्तित्व देखील धोक्यात आले आहे अशातच आज नांदूर मधमेश्वर धरणात मोठ्या प्रमाणात मासेमवृत्त अवस्थेत आढळल्याने धरणातील पक्षांचे तसेच जलचरांचे अस्तित्व देखील धोक्यात आले आहे कारण देश विदेशातील स्थलांतरित पक्षी येथे डेरेदाखल होऊन जलचर वरती गुजराण करतात परंतु आता त्यांच्या देखील अधिवासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

Soybean Procurement Center : मंचर बाजार समितीमध्ये लवकरच सोयाबीन खरेदी केंद्र

Pune Rain : धरणक्षेत्रांत पावसाच्या जोरदार सरी

National Water Awards : पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांवर महाराष्ट्राची छाप

Greenhouse Project Inaguration : वाण विकासासाठी हरितगृह फायदेशीर : डॉ. पाटील

SCROLL FOR NEXT