Farmer Demand: डिंभे-माणिकडोह बोगदा २०२२ मध्ये महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंत्री जयंत पाटील यांनी मंजूर करून घेतला होता. त्याला स्थगिती दिल्याचे समजते. कागदोपत्री ही स्थगिती दिसत नसली तरी कॅबिनेटच्या बैठकीनंतर कागद पुढे सरकलेला नाही. जुन्नर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, करमाळा तालुक्यांतील शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. या बोगद्यासाठी आम्ही कष्ट घेतलेले आहेत. त्याची अंतिम ऑर्डर पाच ऑक्टोबरपर्यंत काढावी. अन्यथा सर्वांत मोठे शेतकरी आंदोलन उभारू, असा इशारा आमदार रोहित पवार यांनी दिला..अहिल्यानगर येथे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांना विविध मागण्यांबाबतचे निवेदन दिल्यानंतर आमदार रोहित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. खासदार नीलेश लंके, पक्षाचे जिल्हाध्यक्ष सीताराम काकडे, नेवासा तालुकाध्यक्ष सतीश थोरात, रामेश्वर निमसे यांच्यासह काँग्रेस, शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते..Kukadi Project Tunnel: कुकडी बोगद्याला विरोध कायम.पवार म्हणाले, की सन २०१८ मध्ये भाजप सत्तेत असताना आंबेगाव येथील आमदारांनी पत्र दिले की, हा बोगदा खालच्या लेव्हलपासून काढावा. त्यानंतर महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आंबेगाव व शिरूर येथील शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये, अशी भूमिका घेण्यात आली..शेतकऱ्यांचा रोष आणि शरद पवार यांनी पत्र दिल्यानेच दुष्काळाचे निकष बदलले. दौरा करत असताना बॅरिकेड लावले जात आहेत. शेतकऱ्यांना हे सरकार का घाबरतेय? अक्षरशः मेटल डिटेक्टर लावून त्या ठिकाणी पाहणी केली जात आहे. शेतकरी काय तुमच्यावर बॉम्ब फेकणार आहेत का?.Maratha Reservation Protest: मराठा आंदोलन चिघळलं; धाराशिवमध्ये आंदोलकांनी तहसीलदारांची खुर्ची पेटवली, अनेक ठिकाणी रास्तो रोको.महाविकास आघाडीच्या काळामध्ये या योजनेचे प्रामुख्याने काम झाले आहे. याचा पाठपुरावा सध्याच्या सरकारमधील नेत्यांनी केला. विशेषतः पालकमंत्री विखे पाटील यांनी यासाठी प्रयत्न केले. परंतु असे असतानाही या बोगद्याचे काम जर थांबत असेल तर सरकार, पालकमंत्री कमजोर पडल्याचे चित्र आहे. आंबेगावचे आमदार अडथळा आणतात, हे चुकीचे आहे. त्यांनी यापूर्वी बोगद्यासाठी पत्र दिले आहे. मग त्यांनी भूमिका का बदलली, तेही त्यांनी स्पष्ट करणे गरजेचे आहे..मला रोखण्यासाठीच तुम्हाला पदमला रोखण्यासाठीच तुम्हाला पद दिले. हे पद किती दिवस मिरवता ते बघ, असे म्हणत विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्यावरही आमदार रोहित पवार यांनी निशाणा साधला. पद असूनही काही करता आले नाही. मुळात त्यांना जिल्हा बँकेच्या निवडणुकीला उभे राहता येणार नाही. त्यामुळे उगाच निवडणूक लढविण्याचा बाऊ करू नये. एवढ्या मोठ्या पदाचा वापर लोकांसाठी करा. स्वतःला सगळं मिळावं, अशी भावना बाजूला ठेवा. लोकांना हे सगळं कळतं आणि ते तुमची जिरवल्याशिवाय राहणार नाही. कांदा पाच रुपयांनी विकला, तेव्हा हेलिकॉप्टरमध्ये फिरत होता. आम्ही उपोषण केल्यानंतर कर्जमाफीचे निकष बदलले. यातून त्यांचे राजकीय वजन कळते. कर्जत-जामखेडने मला ताकद दिली, त्यामुळेच मी राज्यभर जनतेचे प्रश्न मांडू शकतो..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.