Savitribai Phule Pune University Agrowon
ॲग्रो विशेष

Savitribai Phule Pune University : ‘बायॉलॉजी बियॉन्ड बाउंडरीज’ परिषद सोमवारपासून

Biology Beyond Boundaries' Conference : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात २९ ते ३१ जानेवारीदरम्यान वैज्ञानिकांची मांदियाळी जमणार आहे. विद्यापीठाच्या बायोटेक्नॉलॉजी विभागातर्फे ‘बायॉलॉजी बियॉन्ड बाउंडरीज’ या तीनदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

Team Agrowon

अग्रोवन वृत्तसेवा
International conference, Pune : पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात २९ ते ३१ जानेवारीदरम्यान वैज्ञानिकांची मांदियाळी जमणार आहे. विद्यापीठाच्या बायोटेक्नॉलॉजी विभागातर्फे ‘बायॉलॉजी बियॉन्ड बाउंडरीज’ या तीनदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेचे उद्‌घाटन सिरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख व उद्योजक डॉ. सायरस पूनावाला यांच्या हस्ते होणार असून, या वेळी प्रमुख वक्त्या म्हणून डब्ल्यूएचओच्या मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामिनाथन उपस्थित राहणार आहे.

या प्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, प्रभारी कुलसचिव डॉ. विजय खरे, बायोटेक्नॉलॉजी विभाग प्रमुख डॉ. स्मिता झिगांर्डे उपस्थित राहतील. विद्यापीठाचा बायोटेक्नॉलॉजी विभाग, अमेरिकेतील रटगर्स स्कूल ऑफ बायोमेडिकल अँड हेल्थ सायन्सेस आणि रोझवेल पार्क कॉम्प्रिहेन्सिव्ह कॅन्सर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

माइटोकॉन्ड्रिया, सेल डेथ आणि मानवी रोग, मानवी रोग व्यवस्थापनातील संगणकीय यश आणि आरोग्यसेवेतील मूलभूत आणि वैद्यकीय संशोधन आणि परिवर्तन या सर्व प्रमुख क्षेत्रांमध्ये अलीकडील प्रगती अधोरेखित करणे, हे या बैठकीचे उद्दिष्ट आहे. या आंतरराष्ट्रीय परिषदेत जगभरातून ५० हून अधिक शास्त्रज्ञ उपस्थित राहणार आहेत.

यामध्ये प्रामुख्याने ऑक्सफर्ड विद्यापीठाचे कोविशील्ड लस शोधक प्रा. एड्रियन हिल, मलेरिया लस शोधक डॉ. पॅट्रिक डफी, यूएसएमधील सीडीसीचे प्रमुख डॉ. एलिझाबेथ उंगेर यांसारखे जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ, तर रॉबर्ट सेडर, बिल गेट्स फाउंडेशनचे माईक मॅकक्यून आदी जागतिक आरोग्य संघटनेशी संबंधित मान्यवर या परिषदेत सार्वजनिक आरोग्याविषयी चर्चा करणार आहेत. ही परिषद विद्यापीठाच्या भूगर्भशास्त्र विभागात होणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : मराठवाडा, विदर्भात पावसाचा अंदाज; राज्यात शनिवार, रविवार पावसाचा जोर कमी राहणार

Farmers Market : शेतकरी बाजाराचा मुद्दा मागे पडला

Banana Procurement : कमी दरात केळीच्या खरेदीचा धडाका

Fragmentation Act: तुकडेबंदी कायदा रद्दचा शेतकरी आणि नागरिकांना काय फायदा मिळणार ?

Cotton Farming : कापूस उत्पादन वाढीसाठी मूलभूत टिप्स

SCROLL FOR NEXT