Dr. Indra Mani Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Development : कृषी विकासात महिलांची भूमिका मोठी

Vice Chancellor Dr. Indra Mani : कृषी विकास आणि विस्तारात महिलांची भूमिका मोठी, असल्याचे मत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मनी यांनी व्यक्त केले.

Team Agrowon

Tuljapur News : कृषी विकास आणि विस्तारात महिलांची भूमिका मोठी, असल्याचे मत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मनी यांनी व्यक्त केले. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित महिला मेळाव्यात पहिल्या सत्राच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर अटारी पुणेचे संचालक डॉ. सुब्रतो रॉय, कृषी विभागाचे विभागीय सहसंचालक साहेबराव दिवेकर, वनामकृविचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, कृषी विभागाचे अभिमन्यू काशीद, कृषी महाविद्यालय उस्मानाबादचे प्राचार्य डॉ. एम. बी. पाटील, कृषी विज्ञान केंद्राच्या कार्यक्रम समन्वयक वर्षा मरवाळीकर होत्या.

डॉ. इंद्र मणी म्हणाले, की मागील 25 वर्षांमध्ये कृषी महाविद्यापीठांमध्ये मुलींच्या संख्येमध्ये भरपूर वाढ झालेली आहे. त्यामुळे आम्ही मुलींकरिता विद्यापीठांमध्ये खास करून वेगळी व्यायाम शाळा सुरू केलेली आहे.

मुली मोठ्या प्रमाणात विविध खेळांमध्ये निरनिराळ्या स्तरावर दैदीप्यमान यश मिळवत आहेत. ग्रामीण भागातील प्रत्येक महिलांनी कुटुंबासोबत स्वतःच्या स्वास्थ्याकडे लक्ष देणे खूप गरजेचे आहे. प्रत्येक महिलेने स्वतःच्या स्वास्थ्याकडे लक्ष देणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

महिलाही समाजाची सर्जक आहे. संपूर्ण जगाची निर्मिती ही स्त्रीपासून झालेली आहे. आज महिला नोकरी व्यापार आदी सर्व माध्यमातून देश विदेशात चमकत आहेत. बँकॉक सारख्या भारता शेजारील देशात बस वाहक फक्त आणि फक्त महिलांसाठीच राखीव करण्यात आलेले आहे, असेही ते म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cabbage Farming: कोबी पिकात आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब

Brazil Agricultural Cooperation: ब्राझीलसोबत कृषी क्षेत्रामध्ये सहकार्य संधी

Onion MSP Demand: कांद्याला तातडीने प्रतिक्विंटल २ हजार हमीभाव, १,५०० रुपये अनुदान देण्याची मागणी

Akola Heatwave: अकोला जिल्ह्यात अति उष्णतेमुळे होरपळ

Mini kit Seeds Application: मिनीकिट बियाण्यांसाठी अर्जाचा आज शेवटचा दिवस

SCROLL FOR NEXT