Maize Agrowon
ॲग्रो विशेष

Maize Farming : जळगाव जिल्ह्यात मका पिकाच्या क्षेत्रात मोठी वाढ

Maize Production : जळगाव जिल्ह्यात रब्बी पिकांची पेरणी पूर्ण झाली आहे. त्यात जिल्ह्यात खरिपानंतर रब्बीतही मक्याची लागवड वाढली असून, एक लाख दोन हजार हेक्टरवर पोहोचली आहे.

Team Agrowon

Jalgaon News : जळगाव जिल्ह्यात रब्बी पिकांची पेरणी पूर्ण झाली आहे. त्यात जिल्ह्यात खरिपानंतर रब्बीतही मक्याची लागवड वाढली असून, एक लाख दोन हजार हेक्टरवर पोहोचली आहे. हरभऱ्याची पेरणी जळगावात दरवर्षी एक लाख ते एक लाख १० हजार हेक्टरपर्यंत असते. परंतु यंदा हरभऱ्याखालील क्षेत्र सुमारे ९८ हजार हेक्टर एवढे आहे. तर मक्याच्या क्षेत्राने रब्बीत एक लाख हेक्टरचा आकडा अनेक वर्षांनंतर गाठला आहे.

खानदेशात मक्याची लागवड दीड लाख हेक्टरपेक्षा अधिक आहे. यंदा मागील हंगामात खानदेशात मक्याची लागवड सुमारे ९५ हजार हेक्टरवर झाली होती. त्यात जळगाव जिल्ह्यातील लागवड सुमारे ६० हजार हेक्टर एवढी होती. परंतु यंदा मका लागवडीत मोठी वाढ जळगावात दिसत आहे.

मक्याचे टिकून असलेले दर व बाजारातील मागणी यामुळे मका लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. गव्हाचीदेखील विक्रमी ६० हजार हेक्टरवर जिल्ह्यात पेरणी झाली आहे. गव्हाची पेरणी २० ते २२ हजार हेक्टरपर्यंत असायची. यंदा कापसाखालील मोठे क्षेत्र रोगराई, गुलाबी बोंड अळीच्या समस्येने रिकामे झाले. त्यात गहू, मका व हरभरा पेरणी झाली आहे. जळगाव जिल्ह्यात ज्वारीची सुमारे ५१ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे.

ज्वारी पेरणी अनेकांनी टाळली आहे. कारण मागील वेळेस ज्वारी दर कमी होते. जिल्ह्यात यंदा जलसाठे मुबलक आहेत. गिरणा, वाघूर, हतनूर, तोंडापूर, अग्नावती, मंगरूळ, सुकी, अभोडा, अंजनी, बोरी, मन्याड आदी मोठे, मध्यम सिंचन प्रकल्प पूर्ण भरले. त्यात गिरणा, वाघूर व हतनूरमधून रब्बीसाठी आवर्तन सोडण्यात आले आहे.

मका वाणांची टंचाई

यंदा सर्वच मका वाणांची मोठी मागणी रब्बीत होती. मका लागवड ऑक्टोबरअखेरीस सुरू झाली. ही लागवड या महिन्याच्या सुरुवातीलाही झाली आहे. विविध टप्प्यात मका पीक लागवड झाली असून, मका वाणांची टंचाई तयार झाली. काही वाणांची विक्री जादा दरातही अनेक कृषी केंद्रांत झाली आहे. तीन प्रकारच्या मका वाणांची मोठी मागणी जिल्ह्यात होती. मका बियाणे दरातही यंदा वाढ झाली. त्याचाही फटका बसला. एक बॅग (तीन ते चार किलो) २२०० ते ३००० रुपये दरात शेतकऱ्यांना घ्यावी लागली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT