Maize Sowing : मक्याच्या लागवडीत बुलडाणा जिल्ह्याची झेप

Maize Cultivation : यंदाच्या हंगामात एकट्या मोताळ्यात रब्बीत सुमारे ५९०० हेक्टरपर्यंत मक्याची लागवड पोचली आहे.
Maize Crop
Maize SowingAgrowon
Published on
Updated on

Buldana News : मका उत्पादनात विदर्भात अग्रेसर असलेल्या बुलडाणा जिल्ह्यात यंदा सुमारे २३ हजार ५०० हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर लागवड पोचली असून, यंदा तुलनेने पीक परिस्थिती चांगली असल्याचे शेतकरी सांगत आहेत. जिल्ह्यात अनेक शेतकरी मक्याचे विक्रमी उत्पादनही घेत असतात.

बुलडाणा जिल्ह्यात मोताळा, मलकापूर, खामगाव, बुलडाणा, देऊळगावराजा, मेहकर हे तालुके मका उत्पादनात आघाडीवर आहेत. यंदाच्या हंगामात एकट्या मोताळ्यात रब्बीत सुमारे ५९०० हेक्टरपर्यंत मक्याची लागवड पोचली आहे. या तालुक्याचे सरासरी क्षेत्र १२७१ हेक्टर असून, त्या तुलनेत सुमारे ४५७ टक्के अधिक लागवड झाली.

Maize Crop
Maize Sowing : दौंडच्या पूर्व भागात मका पेरणीला वेग

जिल्ह्याचे सरासरी क्षेत्र ११७८१ हेक्टर आहे. त्यातुलनेत यंदा २३ हजार ५०० हेक्टरवर आतापर्यंत लागवड झालेली आहे. अनेकजण अद्यापही लागवड करीत असून हे क्षेत्र दररोज वाढते आहे. मागील काही वर्षात नैसर्गिक आपत्ती तसेच अळीमुळे शेतकरी मक्याच्या उत्पादनात पिछाडीवर होते. मात्र, अळीवर नियंत्रण मिळवण्यात बऱ्यापैकी यश येत असल्याने तसेच हरभरा, गहू या पिकांपेक्षा मका परवडत असल्याने शेतकरी पुन्हा याकडे वळत आहेत.

Maize Crop
Jowar, Maize Sowing : शेतकऱ्यांची ज्वारीकडे पाठ, मक्याला पसंती; रब्बीमध्ये गहू आणि भातालाही शेतकऱ्यांची पसंती

मोताळा अव्वल, शेगाव नाममात्र

मक्याची लागवड ५९०० हेक्टरपर्यंत मोताळ्यात झाली. दुसरीकडे जिल्ह्यात शेगाव तालुक्यात सर्वांत कमी २३ हेक्टरवर पेरणी झाली. मोताळा, नांदुरा, मलकापूर, खामगाव हे घाटाखालील आणि घाटावरील बुलडाणा, चिखली, सिंदखेडराजा हे तालुके मका उत्पादक म्हणून ओळखले जातात.

तालुकानिहाय क्षेत्र

तालुका सरासरी प्रत्यक्ष लागवड

जळगाव जामोद ६०७ १८६४

संग्रामपूर १०६० ६२८

चिखली १११७ १९४६

बुलडाणा २६५९ ३३१७

देऊळगावराजा ११७६ १२०८

मेहकर १९५ ५०४

सिंदखेडराजा ७५९ ३९४

लोणार २३८ १२९

खामगाव ५३६ २३५०

शेगाव ६७ २३

मलकापूर १२३३ ३८७१

मोताळा १२७१ ५८१४

नांदुरा ८५६ १४५७

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com