Sweet Potato Agrowon
ॲग्रो विशेष

Sweet Potato : महशिवरात्रीसाठी रताळी, कवठांची मोठी आवक

Team Agrowon

Pune News : महाशिवरात्रीनिमित्त पुणे बाजार समितीमध्ये गेल्या दोन दिवसांपासून रताळ्यांची सुमारे ८ हजार तर कवठांची सुमारे ४ हजार गोणी आवक झाली. गावरान रताळ्यांना किलोला ३५ ते ३८ तर हायब्रीड रताळ्यांना १४ ते १८ रुपये दर मिळाला. कवठांना शेकड्याला १५० ते १ हजार रुपये दर मिळाला.

रताळ्यांची माहिती अडते अमोल घुले यांनी दिली. ते म्हणाले,‘‘आज (ता. ८) महाशिवरात्री आहे. त्यानिमित्त दोन दिवसांपासून कराड, करमाळा, सोलापूर, मलकापूर भागातून रताळ्यांची आवक झाली. ही आवक गेल्या तीन दिवसांत ८ हजार गोणी होती.

गावरान रताळ्यांना किलोला ३५ ते ३८ रुपये, तर करमाळा भागातून आलेल्या रताळ्यांना दर्जानुसार १४ ते १८ रुपये भाव मिळत आहे. तर किरकोळ बाजारात ४० ते ७० रुपये किलो भाव आहे.

गावरान रताळ्यांची आवक होतेय कमी

गावरान रताळी चवीला गोड, आकाराने लहान आणि दिसायाला आकर्षक असतात. त्यामुळे ग्राहकांकडून त्यांना जास्त मागणी असते. मात्र, मागील काही वर्षांचा विचार केल्यास दिवसेंदिवस गावरान रताळ्यांची आवक कमी होत चालली आहे. पूर्वी बीड जिल्ह्यातून आवक व्हायची. मात्र, येथील बाजारापेक्षा मुंबईला जास्त भाव मिळतो. त्यामुळे तेथून आणि कराड भागातून निर्यात होण्याचे प्रमाण वाढले आहे.

नवीन पांढरा वाण विकसित

करमाळा भागातून येथील बाजारात मोठ्या प्रमाणात गावरान रताळ्याची आवक व्हायची. मात्र, यंदा तेथे नवीन पांढऱ्या वाणाची लागवड वाढली आहे. बेळगाव रताळ्यांच्या धर्तीवर हा वाण विकसित आहे.

त्यामुळे उत्पन्न वाढले आहे. बाजारात त्या भागातून तब्बल ४ ते ५ हजार पोती आवक झाली आहे. मात्र, त्याला गावरानसारखी चव नाही. ते रताळे रंगाने पांढरे असून, बारीक साल आहे. त्याला घाऊक बाजारात किलोस १४ ते १८ रुपये भाव मिळाला आहे.

कवठांची मोठी आवक

कवठांची बार्शी, सोलापूर, नगर, पाथर्डी येथून आवक झाली. यावेळी शेकड्याला १५० ते १ हजार रुपये दर मिळाल्याचे व्यापारी पांडुरंग सुपेकर यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MSP Procurement Center : मका, सोयाबीन किमान आधारभूत खरेदी केंद्रे सुरू करावीत

Rabi Season 2024 : शेतात गाळ, माती, शेणखत टाकण्यास वेग

Solapur DPDC Meeting : ‘जिल्हा वार्षिक’मधील कामांची निविदा प्रक्रिया त्वरित राबवा

Grape Farming : ग्राहक मागणीभिमुख द्राक्ष उत्पादन, विपणन काळाची गरज

Kasuri Methi Market: जास्त उत्पादन देणारी कसुरी मेथीची शेती कशी कराल ?

SCROLL FOR NEXT