Chakan Sweet Potato News : चाकणला पन्नास टन रताळ्याची आवक

Chakan APMC Update : येथील महात्मा फुले बाजारात कर्नाटक राज्यातून तसेच कोल्हापूर जिल्ह्यातून रताळ्याची मोठी आवक झाली. ही आवक सुमारे पन्नास टन आहे.
Sweet Potato
Sweet Potato Agrowon
Published on
Updated on

Pune News : येथील महात्मा फुले बाजारात कर्नाटक राज्यातून तसेच कोल्हापूर जिल्ह्यातून रताळ्याची मोठी आवक झाली. ही आवक सुमारे पन्नास टन आहे. रताळ्याला बाजारात गेल्या आठवड्याच्या तुलनेत दहा रुपये वाढून २५ रुपये प्रति किलोला भाव मिळाला. नवरात्रोत्सवामुळे रताळ्याला मोठी मागणी राहिली, अशी माहिती खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कैलास लिंभोरे, सचिव बाळासाहेब धंद्रे यांनी दिली.

नवरात्रोत्सवात उपवासाला फराळाच्या इतर पदार्थांबरोबरच रताळ्याला मोठी मागणी राहते. त्यामुळे व्यापारी, विक्रेते, शेतकरी चाकण येथील महात्मा फुले बाजारात रताळे विक्रीसाठी घेऊन येतात. सध्या खेड तालुक्याच्या पश्चिम डोंगराळ भागातील नव्याने काढणी केलेला पावसाळी बटाट्याची आवक सुरू झाली आहे.

Sweet Potato
Sweet Potato Cultivation : कशी कराल रताळ्याची लागवड?

हा बटाटा पावसाळी आहे. अजून एक महिना या बटाट्याची आवक सुरू राहणार आहे. या बटाट्याला उत्तर प्रदेश, दिल्ली या बाजारांतून व्यापाऱ्यांची मोठी मागणी आहे.त्यामुळे हा बटाटा सध्या विक्रीसाठी ट्रक भरून यूपी, दिल्लीला जात आहे, असे व्यापारी जमीरभाई काझी, बाजार समितीचे संचालक माणिक गोरे, विक्रम शिंदे, रवींद्र बोराटे यांनी सांगितले.

येथील महात्मा फुले बाजारात इंदूर, आग्रा गुजरात येथील शीतगृहात साठवणूक केलेल्या बटाट्याची आवक होत आहे. या बटाट्यालाही बाजारात १३ ते १९ रुपये प्रति किलोला घाऊक बाजारात भाव मिळत आहे. रविवारी (ता. १५) पावसाळी काढणी केलेल्या नव्या बटाट्याला बाजारात प्रति किलोला पंधरा रुपये भाव मिळाला.

Sweet Potato
Sweet Potato Rate : रताळ्यांना उच्चांकी दर, महाराष्ट्रासह ५ राज्यात निर्यात

हिरव्या मिरचीची सुमारे दहा टन आवक झाली. आज ३० ते ५० रुपये प्रती किलोने घाऊक बाजारात हिरवी मिरची विकली जात आहे. राज्यात प्रसिद्ध असलेल्या या बाजारात सध्या नवरात्र उत्सवात फळभाज्यांचे भाव घसरल्याने ग्राहक मात्र खूष आहे. शेतकरी मात्र चिंता व्यक्त करत आहे.

टोमॅटोची तीस टन आवक, कमाल दर सात रुपये

टोमॅटोला फक्त पाच ते सात रुपये प्रति किलोला भाव मिळत असल्याने उत्पादन खर्च व वाहतूक खर्च ही वसूल होत नाही, अशी अवस्था आहे, असे शेतकरी सुभाष पवळे यांनी सांगितले. बाजारात सुमारे तीस टन टोमॅटोची आवक झाली.

टोमॅटोला किमान पाच ते सात रुपये प्रति किलोला भाव मिळाला. भाव मोठ्या प्रमाणात घसरल्याने परजिल्ह्यातून जे शेतकरी टोमॅटो विक्रीसाठी घेऊन येतात त्यांना हातात काहीच मिळत नाही. त्यामुळे विक्रीसाठी आलेल्या टोमॅटोचा कचरा होत आहे, अशी भयानक परिस्थिती आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com