Chili Processing Center  Agrowon
ॲग्रो विशेष

Chili Processing Center : मराठवाड्यात पहिल्या मिरची प्रक्रिया केंद्राचे भूमिपूजन

Roshan Talape

Chhatrapati Sambhajinagar : सिल्लोड तालुक्यातील भराडी येथे सिल्लोड कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत मराठवाड्यातील पहिल्या मिरची प्रक्रिया सुविधा केंद्राचे भूमिपूजन बुधवारी (ता.२) पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी बनकिन्होळा येथे मिरची प्रक्रिया केंद्र, शीतगृह व निर्यात केंद्र तसेच कंकराळा येथे फळ प्रक्रिया, शीतगृह, साठवणूक, हाताळणी व निर्यात केंद्र प्रकल्पाचे भूमिपूजनही करण्यात आले. या प्रकल्पांसाठी एकूण ३९ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, प्रत्येक केंद्रासाठी १३ कोटी रुपये निधी मंजूर झाला असल्याची माहिती पालकमंत्री सत्तार यांनी दिली.

या प्रसंगी कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम, मॅग्नेटचे प्रकल्प संचालक विनायक कोकरे, डॉ. अनमोल यादव, माजी उपनगराध्यक्ष अब्दुल समीर अ. सत्तार, जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन गाढे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

पोखरा योजनेसाठी ११ हजार कोटींची तरतूद

यावेळी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी पोखरा योजनेसाठी ११ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे जाहीर केले. तसेच सिल्लोड येथे कृषी भवन उभारण्यासाठी ३० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहितीही त्यांनी दिली.

शेतकऱ्यांना अनुदानावर गार्डचे वाटप करण्यात येणार आहे. याशिवाय, "गाव तेथे गोडावून" ही योजना मतदारसंघात प्रभावीपणे राबवली जाईल.
अब्दुल सत्तार, पालकमंत्री, छत्रपती संभाजीनगर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance Claim : विम्यासाठी योग्य नुकसानीच्या पूर्वसूचना कशा द्यायच्या? योग्य पर्याय कसे निवडायचे?

Samruddhi Train : शेतीमाल पार्सलसाठी शेतकऱ्यांची गर्दी

Soybean Procurement : सोयाबीनमधील ओलाव्यामुळे हमीभावाने खरेदीसाठी अडचणी

Crop Insurance : शेतकऱ्यांना विक्रमी पीकविमा

Heavy Rain : परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील चार मंडलांत अतिवृष्टी

SCROLL FOR NEXT