Water Supply Scheme  Agrowon
ॲग्रो विशेष

Water Supply Scheme : भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेवर बंदचे सावट

Bhose Water Crisis: : दक्षिण भागातील दुष्काळी गावाची तहान भागवणाऱ्या भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे ग्रामपंचायतीकडील पाणीपट्टीची येणे बाकी १८ लाख तर थकित वीजबिल २.५ कोटी आहे

Team Agrowon

Solapur News : दक्षिण भागातील दुष्काळी गावाची तहान भागवणाऱ्या भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे ग्रामपंचायतीकडील पाणीपट्टीची येणे बाकी १८ लाख तर थकित वीजबिल २.५ कोटी आहे, कार्यकाल संपलेल्या सरपंचाच्या हाती शिखर समितीची जबाबदारी असल्यामुळे ऐन उन्हाळ्यात योजनेवर बंदचे सावट आहे.

तालुक्याच्या दक्षिण भागातील ३९ गावांमध्ये पाणीटंचाईपासून सुटका करण्यासाठी लोकवर्गणीची अट रद्द करून भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना राबवली असून, या योजनेचे वीजबिल जास्त असल्याने चालवणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही अशा परिस्थितीत मागील दोन वर्षांपूर्वी बऱ्याच ग्रामपंचायतींनी थकबाकी रक्कम न भरल्यामुळे शासनाकडे आलेली अनुदानाची रक्कम हे वीजबिल भरण्यासाठी वापरले आहे.

सध्या ३९ गावांतील जवळपास दहा गावांनी शिखर समितीकडे आगाऊ रक्कम भरली. पुढील दोन महिन्यात उन्हाळ्यातील भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. याठिकाणी व वीजबिलांमुळे ही योजना परवडत नसल्यामुळे या ठिकाणी सौर प्रकल्पाद्वारे वीजपुरवठा करण्याची मागणी होत आहे. जुनोनी येथील जलशुद्धीकरण केंद्रावर सौर वीजपुरवठाचे काम अंतिम टप्प्यात आहे.

तर उचेठाण बंधाऱ्यावरील सौर प्रकल्पाचे काम होणे गरजेचे आहे, टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी करावा लागणाऱ्या खर्चापेक्षा या योजनेतून कमी खर्चात पाणीपुरवठा करता येणे शक्य आहे. मात्र, याकडे सोईस्कर त्या दुर्लक्ष केले जात आहे. सध्या अन्य पर्याय शोधून खासगी उत्पन्न देखील पाणीपुट्टीच्या माध्यमातून करता येऊ शकते.

गावनिहाय येणेबाकी रक्कम पुढीलप्रमाणे खडकी (३३०६२), जुनोनी (१,६३,७१७), पाटकळ (२,१२,९५०), मेटकरवाडी (८८,९७०), हिवरगाव (९८,७४५), हाजापूर(४३३५५), डोंगरगाव(१,८५,०७०), खुपसंगी (१७८५४२), गोणेवाडी(२,१९,४२१), जालिहाळ ३२४३४, चांभारवस्ती रडडे (१९८७६८), लक्ष्मीनगर रड्डे (१०८३५२), जित्ती (२७३), हुन्नुर (६२२४५) मानेवाडी (३२५००), बावची (६७४३५),

चिक्कलगी (१२३०), निंबोणी (६३१००), नंदेश्वर (३,५२,५१२), भाळवणी (१३६२८७), खवे (५८१०७), महमदाबाद हु.(७३१२३), येळगी (७८००), जंगलगी (१०७९१८), हुलजंती (१६०६८८), मारोळी (२१४१९०), आसबेवाडी (४२०१८) तर शिवनगी, लवंगी, पौट, सोड्डी, रड्डे,सलगर खु, लोणार, सलगर बु, पडोळकरवाडी, शिरनांदगी, भोसे, सिद्धनकेरी, लेंडवे चिंचाळे या गावाने आगाऊ रक्कम भरली आहे. मात्र महावितरणकडून वीजबिलाच्या वसुलीसाठी विद्युत पुरवठा केव्हाही खंडित केला जाऊ शकतो याची मात्र शाश्वती नाही.

या योजनेतून १००० लिटरला वीस रुपये आकारणी आहे. मात्र, त्यासाठी होणारा खर्च अधिक असल्यामुळे योजना शिखर समिती ऐवजी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने चालवावी, विजबिल आकारणीत औद्योगिकचा दर लावल्यामुळे ही रक्कम अडीच कोटीच्या घरात गेली, उन्हाळ्यातील संभाव्य टंचाई लक्षात घेता वीजबिल शासनाने भरावे, या योजनेमुळे या भागाचे भागातील लोकांचे स्थलांतर थांबल्यामुळे ही योजना कायमस्वरूपी राहणे गरजेचे आहे.
- मनीषा खताळ, अध्यक्ष, शिखर समिती भोसे प्रादेशिक

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Land Fragmentation Act: शहरी भागात तुकडेबंदी कायदा रद्द करण्याची महसूल मंत्री बावनकुळे यांची विधानसभेत घोषणा

QR Code For fertilizer: ‘क्यूआर कोड’वरून कळणार उपलब्ध खते

Bridge For Ghanegar: साकवावरून जीवघेणा प्रवास

Dahanu Floods: डहाणूमध्ये सूर्या नदीला पूर; सतर्कतेचा इशारा

Tree Plantation: दहा हजार वृक्ष लागवडीचा संकल्प

SCROLL FOR NEXT