Bhik Mango Agitation Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Bill Issue : ऊस बिलासाठी भीक मांगो आंदोलन

Team Agrowon

Dharashiv News : तुळजाभवानी शेतकरी सहकारी साखर कारखाना नळदुर्ग संचलित गोकुळ शुगर इन्स्टिट्यूट (धोत्री, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर) यांच्याकडून शेतकऱ्यांची ऊसबीले मिळावीत, यासाठी गुरूवारी (ता. एक) भीक मांगो आंदोलन करण्यात आले.

येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून भीक मांगो आंदोलनास प्रारंभ झाला.अमोल जाधव, माजी नगरसेवक राहुल खपले यांच्या प्रमुख उपस्थितीत भीक मांगो आंदोलन करण्यात आले.

या वेळी नवनाथ जगताप, राज खपले, शरद जगदाळे, शेतकरी सतिश आडे, महेश कोळेकर, अंकुश लोकरे, वीजु नाईक, संतोष गाडे, अर्जुन कोळेकर, अजित तांबे, संजय देशमुख, शकीर मुलाणी, मोहन कोरेकर, अजित क्षीरसागर आदी उपस्थित होते. या आंदोलनामुळे शेतकऱ्यांच्या ऊस बिलाच्या मागणीकडे लक्ष वेधण्यात आल्याचे माजी नगरसेवक राहुल खपले यांनी सांगितले.

आगामी काळात येत्या ता. दहा ऑगस्टपर्यत शेतकऱ्यांची ऊसाचे पैसे दिले नाही तर गनिमी कावा पद्धतीने आंदोलन करणार आहोत. तसेच भीकमांगो आंदोलनात जमा झालेली ५२७ रूपयांची रक्कम कार्यकारी संचालकास पाठविण्यात येणार आहे.
अमोल जाधव, आंदोलनकर्ते, तुळजापूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Rate : नगरमध्ये कांदा प्रति क्विंटल ५२०० रुपये

Sugar Industry : भारत-ब्राझीलमधील साखर उद्योगाचा गोडवा वाढला

Food Industry Development: सरकारकडून अन्न प्रक्रिया क्षेत्रात अनेक सुधारणा

Monsoon 2024 : मॉन्सूनचा परतीचा मुहूर्त लांबतोय

Maharashtra Rain : विजांसह पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT