LK Advani Agrowon
ॲग्रो विशेष

Bharat Ratna Award : लालकृष्ण अडवानी यांना ‘भारतरत्न’

LK Advani : भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांना देशाचा सर्वोच्च भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे.

Team Agrowon

New Delhi News : भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांना देशाचा सर्वोच्च भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत यासंदर्भातील माहिती दिली आहे.

‘‘लालकृष्ण अडवानी यांना भारतरत्न मिळत असल्याने मला खूप आनंद झाला आहे. मी त्यांना याविषयी बोलून त्यांचे अभिनंदन केले आहे,’’ असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.

अडवानी हे एकेकाळचे सर्वात प्रतिष्ठित नेते आहेत. त्यांनी देशाच्या विकासासाठी महत्त्वाचे योगदान दिले आहे. अडवानी हे तळागाळात काम करून वरती आलेले आणि उपपंतप्रधान पदापर्यंत गेलेले नेते आहेत. त्यांनी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. संसदेतील त्यांची भाषणे अभ्यासपूर्ण आणि ऐकण्यासारखी असायची,’’ असे मोदी यांनी नमूद केले आहे.

अडवानी हे राम मंदिर आंदोलनाचे प्रमुख चेहरा होते. राम मंदिर निर्माणाचे श्रेय त्यांना दिले जाते. त्यामुळे मोदी सरकारने त्यांना त्यांच्या कार्यासाठी गिफ्ट दिल्याचे बोलले जात आहे. काही दिवसांपूर्वी मोदी सरकारने जननायक कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न जाहीर केला होता.

अडवानी यांनी भाजपच्या वाढीसाठी अथक प्रयत्न केले. जवळपास ५० वर्ष ते राजकारणात सक्रिय होते. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यानंतर ते भाजपचे दुसरे सर्वात मोठे नेते होते. १९९६ मध्ये सरकार बनल्यानंतर तेच पंतप्रधान होतील, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. पण, त्यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाला सहमती दर्शवली.

‘‘भारतरत्नसाठी जाहीर झालेली कर्पुरी ठाकूर आणि लालकृष्ण अडवानी ही दोन्ही नावे योग्य आहेत. भाजप नेते, संसदेचे सभासद आणि मंत्री म्हणून त्यांची निवड उशिरा झाली पण योग्य निवड झाली. अडवानी यांना योग्य सन्मान मिळाला आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bajara Farming: बाजरीची पेरणी आणि खत व्यवस्थापन; चांगल्या उत्पादनासाठी महत्त्वाच्या गोष्टी

RBI MPC Meeting 2026: कर्जाचा हप्ता वाढणार नाही, पण कमी पावसामुळे महागाई वाढणार- आरबीआय गर्व्हनर

Modern Sowing Machines: पेरणीकरिता आधुनिक यंत्रांचा वापर

Crop Impact Management: विदर्भातील पर्जन्यमान अन् पिकांवरील परिणाम

Kharif Crop Planning: खरिपाच्या पूर्वतयारीसाठी हे मुद्दे नका विसरू

SCROLL FOR NEXT