सकाळ न्यूज नेटवर्क
Bhartratna Award : नवी दिल्ली, पाटणा : बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना ‘भारतरत्न’ हा देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान मंगळवारी (ता. २३) मरणोत्तर जाहीर करण्यात आला. कर्पूरी ठाकूर यांच्या जन्मशताब्दीच्या आहे. एक दिवस आधीच केंद्र सरकारने हा सन्मान जाहीर केला. मागासवर्गीयांसाठी काम करणारे नेते म्हणून ठाकूर यांची ओळख आहे.
‘भारतरत्न’ने सन्मानित होणारे कर्पूरी ठाकूर हे बिहारमधील तिसरे नेते आहेत. यापूर्वी पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद आणि लोकनायक जयप्रकाश नारायण यांना या सन्मानाने गौरविण्यात आले आहे. सर्वसाधारणपणे प्रजासत्ताक दिनाच्या आदल्या दिवशी भारतरत्न आणि इतर पद्म सन्मानांची घोषणा केंद्र सरकारमार्फत करण्यात येते. या वेळी दोन दिवस आधीच ही घोषणा करण्यात आली. राष्ट्रपतींच्या सचिवालयामार्फत याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली. बिहारच्या १५ कोटी लोकांच्या वतीने सरकारला धन्यवाद देतो, अशी प्रतिक्रिया कर्पूरी ठाकूर यांचे चिरंजीव रामनाथ ठाकूर यांनी व्यक्त केली.
कर्पूरी ठाकूर यांचा जन्म १९२४ मध्ये नाभिक कुटुंबात झाला. समाजातील उपेक्षितांसाठी त्यांनी आयुष्यभर काम केले. कर्पूरी ठाकूर हे बिहारचे दोनदा मुख्यमंत्री होते. पहिल्यांदा २२ डिसेंबर १९७० रोजी त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांनी घेतलेल्या अनेक निर्णयांवर वाद झाले होते.त्यांच्या निर्णयांना पक्षांतर्गतच विरोध झाला. त्यामुळे सहा महिन्यांतच त्यांचे सरकार पडले. जनता पक्षाचे सरकार सत्तेवर आले तेव्हा ते २४ जून १९७७ रोजी दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. ते एप्रिल १९७९ पर्यंत पदावर होते.
मागासवर्गीयांसाठी आरक्षणाची मर्यादा वाढविण्याची शिफारस मुंगेरीलाल आयोगाने केली होती. त्याची अंमलबजावणी त्यांनी केली.त्यांनी मागासवर्गीयांसाठी १२ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाने त्यांची प्रतिमा जननायक म्हणून तयार झाली. मॅट्रिकच्या परीक्षेत इंग्रजी विषयाची सक्ती रद्द करण्याचा निर्णयही त्यांनी घेतला होता. आयुष्यात त्यांनी समाजवादी विचाराची पताका सोडली नाही. १७ फेब्रुवारी १९८८ मध्ये त्यांचे निधन झाले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.