Sand Policy Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Sand Policy : राज्यात भंडारा जिल्ह्यात सर्वाधिक वाळू विक्री

Bhandara Sand Update : नवीन वाळू धोरण राबविण्यात येत आहे. या योजनेत वाळूची सर्वाधिक विक्री व नोंदणी भंडारा जिल्ह्यात झाली आहे.

Team Agrowon

Nagpur News : नवीन वाळू धोरण राबविण्यात येत आहे. या योजनेत वाळूची सर्वाधिक विक्री व नोंदणी भंडारा जिल्ह्यात झाली आहे. २ हजार ७३६ नागरिकांनी २० हजार ब्रास वाळूसाठी ऑनलाइन नोंदणी केली आहे. त्यापैकी १६ हजार २९३ ब्रास वाळूची विक्री झाली आहे.

नवीन वाळू धोरणानुसार वाळूसाठी ‘महाखनिज’ या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने नोंदणीची सुविधा आहे. यानुसार ६०० रुपये ब्रास प्रमाणे वाळू नागरिकांना मिळते.

वाहतुकीसाठी सशुल्क सुविधा उपलब्ध असल्याने घरपोच वाळू मिळत आहे. नोंदणी केलेल्या नागरिकांना सुलभपणे वाळू उपलब्ध व्हावी, यासाठी चार वाळू विक्री केंद्रे (डेपो) सुरू केले आहेत. या केंद्रांवर ५३ हजार २० ब्रास वाळू उपलब्ध आहे. त्यापैकी ४९ हजार २८० ब्रास वाळू ऑनलाइन उपलब्ध आहे.

नागपूर जिल्ह्यात ११ केंद्रांवरून वाळू विक्री होत आहे. जिल्ह्यात ४८ हजार ९५० ब्रास वाळूसाठा आहे. त्यापैकी ४६ हजार ४६४ ब्रास वाळू ऑनलाइन विक्रीसाठी आहे. ४४४ नागरिकांनी ३ हजार ०६८ ब्रास वाळूची ऑनलाइन नोंदणी केली आहे. त्यापैकी ५८२ ब्रास वाळू घरपोच पुरविली आहे.

वर्धा येथे ९५३ नागरिकांनी ६ हजार ६१८ ब्रास वाळूची नोंदणी केली आहे. त्यापैकी ३ हजार ५८२ ब्रास पुरविली आहे. ७ डेपोंमध्ये ४ हजार ३३१ ब्रास साठा उपलब्ध आहे. गोंदियात ५ केंद्रावर २९ नागरिकांनी २७२ ब्राससाठी नोंदणी केली आहे. जिल्ह्यात ९८ हजार ७६६ ब्रास वाळूचा साठा आहे.

ऑनलाइन नोंदणीत नगर दुसऱ्या स्थानी

भंडारा जिल्ह्यानंतर राज्यात सर्वाधिक ऑनलाइन नोंदणी नगर जिल्ह्यात झाली आहे. वाळूसाठी २ हजार २४५ नागरिकांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. त्यांच्यासाठी १५ हजार ८८५ ब्रास वाळू दिली आहे. जिल्ह्यात २५ हजार ९०६ ब्रास वाळू उपलब्ध आहे. यापैकी २२ हजार २५ ब्रास वाळू ऑनलाइन नोंदणीधारकांसाठी आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Biogas Energy: ‘एलपीजी’वाले गॅसवर; बायोगॅस उभारणाऱ्यांना ‘नो टेन्शन’

Livestock Farming: पशुपालन उद्योजकतेस मिळणार चालना

Middle East Conflict: इराणच्या सर्वोच्च नेत्यांना लक्ष्य करण्याच्या रणनीतीचे विपरीत परिणाम

Agriculture Subsidy: कृषी अवजारे बँक स्थापनेसाठी मिळणार ६० टक्के अनुदान

Sugar Production: देशातील साखर उत्पादनात ८६ टक्के वाटा तीन राज्यांचा

SCROLL FOR NEXT