Bhagwat Karad Agrowon
ॲग्रो विशेष

Central Government Scheme : केंद्राच्या योजनांचा विविध घटकांना लाभ

Bhagwat Karad : देशातील गरीब युवक, शेतकरी, कामगार यांचे हित लक्षात घेत केंद्र शासनाने अनेक योजना सुरू केल्या आहेत. योजनांचा विविध घटकांना लाभ होत, असल्याचे प्रतिपादन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केले.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar : केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनांचे लाभ यंत्रणेने तळागाळातील प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावेत. देशातील गरीब युवक, शेतकरी, कामगार यांचे हित लक्षात घेत केंद्र शासनाने अनेक योजना सुरू केल्या आहेत. योजनांचा विविध घटकांना लाभ होत, असल्याचे प्रतिपादन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केले.

मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर आयोजित ‘स्वनिधी से समृद्धी’ संमेलनात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. कराड बोलत होते. या वेळी महानगरपालिकेचे आयुक्त जी. श्रीकांत, स्टेट बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक विनय टोनसे, बँक ऑफ महाराष्ट्र कार्यकारी संचालक आशिष पांडे,

महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे चेअरमन मिलिंद घरड, एसबीआयचे अरविंद कुमार सिंग, प्रदीप पराठे, नाबार्डचे आर. डी. देशमुख, बँक ऑफ महाराष्ट्र विभागीय व्यवस्थापक विवेक नाचणे, एसबीआयचे डीजीएम जितेंद्र ठाकूर, शिरीष बोराळकर उपस्थित होते.

अर्थ राज्यमंत्री डॉ. कराड म्हणाले, की स्वनिधी से समृद्धी ही गोरगरीब लोकांसाठी योजना आहे. या योजनेमध्ये दहा, वीस आणि पन्नास हजार रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते. आर्थिक विकासाला हातभार लावण्यासाठी ही योजना महत्त्वपूर्ण आहे.

तसेच सावकारीच्या पाशातून मुक्त करण्यासाठी स्वनिधी ही महत्त्वाची योजना राहिली आहे. प्रधानमंत्री सुरक्षा बिमा, जीवन ज्योती, मातृत्व योजना, आयुष्यमान कार्ड, जननी सुरक्षा, गरीब कल्याण, उज्ज्वला योजना या योजनांचा लाभ देखील यापुढे लाभार्थ्यांना मिळणार असून, त्यासाठी स्वनिधी से समृद्धी अभियान सुरू केले आहे.

जास्तीत जास्त नागरिकांना या अभियानात नोंदणी करून लाभ घ्यावा. असे आवाहन डॉ. कराड यांनी केले. यावेळी लाभार्थ्यांना कर्जवाटपाचे धनादेश वाटप करण्यात आले. या वेळी लाभार्थी यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

First T2T Genome of Pigeonpea : देशातील पहिला 'टी2टी' जीनोम विकसित; तूर उत्पादन वाढीसाठी होणार फायदा

Sugarcane Crop Damage: अतिवृष्टिबाधित लोळलेल्या उसाचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना

Artificial Groundwater Recharge: कृत्रिम भूजल पुनर्भरणाचे तंत्रज्ञान

Drip Irrigation Subsidy: ठिबक सिंचनासाठी ५५ टक्के अनुदान, दुसऱ्या टप्प्यात २०६ कोटी निधी मंजूर

Cocopeat Sterilization: कोकोपीटचे निर्जंतुकीकरण करताना...

SCROLL FOR NEXT