Maharashtra Vidhansabha Result 2024 Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Vidhansabha Result 2024 : लाडकी बहिण योजनेचा महायुतीला फायदा; सोयाबीन दराचा मुद्दा ठरला 'फेल'?

Vidhansabha Live Result : महायुतीच्या नेत्यांनी प्रचारसभेत लाडकी बहिण योजनेचा जोरदार प्रचार केला. तर दुसरीकडे महायुतीनं जाहीरनाम्यात सत्तेत आलो तर १५०० ऐवजी लाडक्या बहिणीला २१०० रुपये प्रति महिना देऊ अशी घोषणा केली होती.

Dhananjay Sanap

Maharashtra Vidhansabha Result 2024 Live Update : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मराठा आंदोलन, सोयाबीन कापसापेक्षाही लाडकी बहिण योजनेचा फॅक्टर महत्त्वाचा ठरत असल्याचं सुरुवातीच्या कलावरून दिसू लागलं आहे. त्यामुळे सुरुवातीच्या कलात म्हणजेच १० वाजून ३१ मिनिटापर्यंत महायुतीने २८८ पैकी २१७ जागांवर आघाडी घेतली आहे. तर महाविकास आघाडीला केवळ ५२ जागांवर आघाडी मिळाली आहे. तसेच १५ जागांवर इतर छोट्या पक्षांना आघाडी मिळाली आहे.

महिलांचा कल महायुतीकडे?

यंदा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढला. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राज्यात ६१ टक्के मतदान झाले होते. परंतु यंदा मात्र राज्यात ६६ टक्के मतदान झाले. या वाढलेल्या टक्क्यात महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर दिसून आला. वाढलेल्या मतांची टक्केवारी महायुतीच्या बाजूनं झुकल्याची सुरुवातीच्या कलावरून दिसू लागलं आहे. अर्थात हे सुरुवातीचे कल आहेत. दुपारनंतर चित्र अधिक स्पष्ट होईल.

लाडकी बहिण योजना

विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतून महायुतीनं सरकारनं राज्यातील १ कोटी ९६ लाख ४३ हजार महिलांच्या खात्यावर तीन हप्त्यांचा निधी वाटप केला होता. त्यातून सप्टेंबर महिन्यात महिलांना प्रति महिना १ हजार ५०० रुपये याप्रमाणे ४ हजार ५०० रुपये जमा झाले होते. तसेच आचारसंहितेपूर्वीच काही महिलांच्या खात्यावर पाच महिन्यांचे म्हणजेच ७ हजार ५०० रुपये महायुती सरकारने जमा केले होते. त्यामुळे महिला मतदाराने महायुतीच्या बाजूनं कौल देतील असा राजकीय विश्लेषकांचा अंदाज होता.

महायुतीचा प्रचार

महायुतीच्या नेत्यांनी प्रचारसभेत लाडकी बहिण योजनेचा जोरदार प्रचार केला. तर दुसरीकडे महायुतीनं जाहीरनाम्यात सत्तेत आलो तर १५०० ऐवजी लाडक्या बहिणीला २१०० रुपये प्रति महिना देऊ अशी घोषणा केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही लाडकी बहिण योजनेतून महिला सक्षमीकरण होत असल्याचा दावा प्रचारसभेत केला होता.

तर महायुतीचे एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी प्रचारसभेत पुन्हा सत्तेत आल्यास लाडक्या बहिणीला २१०० रुपये प्रतिमहिना देऊ यावर भर दिला होता. तर महाविकास आघाडी सरकार आलं तर लाडकी बहिण योजना बंद होईल, असं नरेटीव्ह पसरवलं होतं. त्याचा फायदा महायुतीला होत असल्याचं सुरुवातीच्या कलावरून दिसत आहे.

महिलांचा कौल

महाविकास आघाडीने सत्तेत आलो तर लाडकी बहिणचे महिन्याला ३ हजार रुपये देऊ असं आश्वासन दिलं होतं. परंतु महाविकास आघाडी या योजनेला खोडा घालेल, असा महायुतीकडून जोरदार प्रचार केला गेला. परिणामी महिलांचा कल महायुतीकडे राहिल्याचं सुरुवातीच्या कलावरून दिसतं.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mango Production : सातपुड्यात आंब्यांच्या चांगल्या उत्पादनाची अपेक्षा

Maharashtra Politics : फडणवीस यांच्या नावाची घोषणा लांबल्याने समर्थकांत अस्वस्थता

Co-Generation Subsidy : सात कारखान्यांच्या सहवीज प्रकल्पांना अनुदान नाकारले

Adam Master Retirement : माजी आमदार आडम मास्तरांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा

Garlic Import : अफगाणिस्तानातून लसणाची आयात

SCROLL FOR NEXT