Grape Pruning  Agrowon
ॲग्रो विशेष

Grape Pruning : द्राक्ष बागांच्या फळधारणा छाटणीला सुरुवात

Grape Farming : द्राक्ष हंगामासाठी महत्त्वाची असलेली फळधारणा छाटणीची लगबग सुरू झाली आहे. पावसाचा धोका पत्करुन आगाप छाटणीचा श्रीगणेशा झाला आहे.

Team Agrowon

Nashik News : द्राक्ष हंगामासाठी महत्त्वाची असलेली फळधारणा छाटणीची लगबग सुरू झाली आहे. पावसाचा धोका पत्करुन आगाप छाटणीचा श्रीगणेशा झाला आहे. निफाड तालुक्यातील ५० हजार एकरवरील बागांपैकी सप्टेंबर अखेरपर्यंत २० टक्के द्राक्षबागांच्या छाटण्या होण्याची शक्यता आहे.

बहुतांश शेतकऱ्यांनी ऑक्टोबरमधील विविध मुहुर्तावर छाटणीचे नियोजन केले आहे. पावसाने उघडीप दिल्याने फळछाटणीसाठी आदिवासी मजूर दाखल होत आहे. सप्टेंबर महिन्याच्या मध्यावर दरवर्षी निफाड तालुक्यातील द्राक्षबागांची फळधारणा छाटणी धांदल उडते. महिनाभरात धुव्वाधार पावसाने बागांमधील द्राक्षवेलींची पानगळ झाली आहे.

पानगळ झालेल्या द्राक्षवेलींची छाटणी केल्याशिवाय शेतकऱ्यांकडे पर्याय दिसत नाही. शिवाय मोठे क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांनी जोखीम पत्करून रंगीत वाणांच्या बागेच्या छाटणीचे काम हाती घेतले आहे. गणपती, नवरोत्रोत्सवाच्या मुहुर्तावर द्राक्षबागांची छाटणी करण्याची पूर्वी शेतकऱ्यांची असलेली श्रद्धा आजही काही प्रमाणात आहे. पण, मुहुर्तावरच्या छाटणीच्या झळा शेतकऱ्यांना बसल्या आहेत.

एकाच दिवशी सरसकट छाटणीचे दुष्पपरिणाम शेतकऱ्यांना सोसावे लागतात. त्यात बागेतील वांझ काढणे, घडबुडवणी ही कामे एकाच वेळी येतात. त्या कामासाठी मजुरांकडून शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी केली जाते.

प्रतिकुल हवामान एकाच टप्प्यात आल्यास द्राक्षबागा रोगांना बळी पडून औषध फवारणीचा खर्च वाढतो. शिवाय एकाच वेळी सर्व द्राक्ष बाजारात येत असल्याने बाजारभावाचाही धोका असतो. त्यामुळे बागांची विभागणी करून आपल्या सोयीने आता शेतकरी छाटणी करीत आहे.

द्राक्षबागांना पावसाचा धोका बघून काही क्षेत्रातील छाटणीचे काम हाती घेतले आहे. छाटणीनंतर वेलींना पेस्टसह औषध फवारणी, खतांच्या मात्रा देण्याचे नियोजन केले आहे.
- साहेबराव देशमाने, द्राक्ष उत्पादक, पिंपळगाव बसवंत

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा 344.74 कोटीं निधी वळवला

Silkworm Monsoon Care: पावसाळ्यात रेशीम अळी संगोपन करताना घ्यावयाची काळजी

Kisan Credit Card: किसान क्रेडिट कार्ड : मत्स्य व्यवसायासाठी आर्थिक सक्षमीकरण

Monsoon Parasite Control: पावसाळ्यातील परजीवी कीटकांचे एकात्मिक व्यवस्थापन

Animal Health Protection: पशू, मानव आरोग्याचे संरक्षण

SCROLL FOR NEXT