Farmers Protest  Agrowon
ॲग्रो विशेष

Farmers Protest : भाजपला पंजाब शेतकऱ्यांचा तीव्र विरोध; नेत्यांना गावबंदी

Village Ban to BJP leaders : पंजाब-हरियाणाच्या शंभू सीमेवर हमीभाव कायद्यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी आपला विरोध तीव्र केला आहे. १३ फेब्रुवारी पासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मागण्यांवर दुर्लक्ष करणाऱ्या भाजपला धडा शिवकण्यासाठी पंजाबमधील शेतकऱ्यांनी थेट भाजप नेत्यांना गाव बंदी केली आहे. तसेच भाजपच्या विरोधात पोस्टर लावले आहेत.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : पंजाब-हरियाणाच्या शंभू सीमेवर शेतकरी हजारोंच्या संख्येने हमीभाव कायद्यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. १३ फेब्रुवारी पासून शेतकरी आंदोलन करत असून याकडे केंद्रातील सत्ताधारी भाजप सरकार दुर्लक्ष करत आहे. तर चार बैठका होऊनही अजूनही कोणताच तोडगा काढलेला नाही किंवा सध्या कोणतीच चर्चा सुरू नाही. यादरम्यान आता लोकसभा निवडणुकांची घोषणा झाली असून यात सर्व राजकीय पक्ष उतरलेले आहेत. तर भाजपसह प्रमुख विरोधी पक्षांनी आपले उमेदवार मैदानात उतरवले आहेत. मात्र पंजाबमध्ये भाजपची डोकेदुखी वाढली असून येथे शेतकऱ्यांनी आपला विरोध तीव्र केला आहे. भाजपने पंजाबमध्ये जाहीर केलेल्या उमेदवारांनी मतदान मागण्यासाठी येऊ नये, असे बॅनर संगरूर जिल्ह्यात लावण्यात आले आहेत. याचबरोबर जिल्ह्यातील वेगवेगळ्या गावांत भाजपच्या नेत्यांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. तर पंजाबमधील २६ बाजार समित्या विसर्जित केल्याचा रोष शेतकऱ्यांमध्ये दिसत असून आपच्या उमेदवारांना देखील विरोध वाढत आहे. 

पंजाब-हरियाणातील शेतकरी हमीभाव कायद्यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. सरकारने त्यांच्या पिकांना एमएसपीप्रमाणे हमी द्यावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. याबाबत सरकार आणि शेतकरी संघटनांमध्ये चर्चेच्या चार फेऱ्या झाल्या. मात्र काहीही निष्पन्न निघाले नाहीत. यादरम्यान निवडणूक आचारसंहिता लागली असून शेतकरी मात्र आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. तर जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत मागे हटणार नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

भाजप आणि आपवर शेतकरी नाराज

यादरम्यान पंजाबमध्ये भाजप आणि आपवर शेतकरी नाराज झाल्याचे दिसत आहे. येथील संगरूर जिल्ह्यातील विविध गावामध्ये शेतकऱ्यांनी भाजप नेत्यांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे. संगरूरमधून मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील नमोल गावात पोस्टर लावण्यात आले आहेत.  यामध्ये भाजप नेत्यांनी या भागात येऊन मत मागू नका, असा थेट इशारा देण्यात आला आहे. 

तसेच दुसरीकडे पंजाबमधील २६ बाजार समित्या विसर्जित केल्याच्या राग देखील पंजाबमधील शेतकऱ्यांमध्ये दिसत आहे. येथे शेतकरी संतप्त झाले असून त्यांनी निवडणूक प्रचारासाठी आपच्या कोणत्याही उमेदवाराला गावात येऊ देणार नसल्याचे म्हटले आहे.  तर २१ फेब्रुवारी रोजी खनौरी सीमेवर सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत मृत झालेल्या शेतकरी आंदोलक शुभकरन सिंग यांच्या नावाने हे पोस्टर्स लावले आहे.

शुभकरन सिंग यांच्या नावाने पोस्टर्स

बीकेयू आझादच्या फोटो व्यतिरिक्त, पोस्टरमध्ये संगरूरमधील प्रीतपाल सिंग यांचा फोटो देखील वापरण्यात आला आहे. हरियाणा पोलिसांच्या हल्ल्यात ते जखमी झाले होते.  तसेच अशाच प्रकारचा असंतोष गिदरबाहातील भारू गावात देखील व्यक्त केला जात आहे. येथे गेल्या चार दिवसांपासून भाजपचा निषेध व्यक्त करणारे पोस्टर्स भिंतींवर लावण्यात आले आहेत. विशेष म्हणजे येथील मानसा क्षेत्रात शेतकरी आंदोलनावरून कोणतीच निदर्शने झालेली नाहीत. मात्र शेतकरी आपला निषेध व्यक्त करत आहेत. 

यावरून बीकेयू आझादचे हॅप्पी सिंग नमोल यांनी, "भाजपचा निषेध करणे हा आमचा विशेषाधिकार आहे. नमोल गावाने आमचा विरोध व्यक्त करण्यासाठी हा प्रतीकात्मक दृष्टिकोन निवडला आहे." असे म्हटले आहे. तसेच राष्ट्रीय समन्वय समितीचे सदस्य डॉ. दर्शन पाल यांनी काळे झेंडे, निदर्शने आणि तळागाळातील लोकांना एकत्र करून भाजपचा मुकाबला करण्याची योजना आखली. 

भाजपचे ६ उमेदवार 

लोकसभा निवडणुकांच्या तारखांच्या घोषणेनंतर भाजपने पंजाबमध्ये ६ जागांवर आपले उमेदवार जाहीर केले आहेत. यात आपमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले सुशील कुमार रिंकू, गुरुदासपूरमधून दिनेश सिंग बब्बू, अमृतसरमधून तरनजीत सिंग संधू, जालंधरमधून सुशील कुमार रिंकू, लुधियानामधून रवनीत सिंग बिट्टू, फरीदकोटमधून हंसराज हंस यांचा समावेश आहे. तसेच पतियाळा येथून प्रनीत कौर यांना मैदानात उतरवले आहे. तर अभिनेता सनी देओल यांचे तिकीट कापत दिनेश सिंग बब्बू यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Gharkul Yojana : ग्रामीण भागातील घरकुलांना शहरीप्रमाणे निधी द्या

Women Entrepreneur : महिला उद्योजकांनी विक्री व्यवस्था उभारणे आवश्यक ः आवटे

Soybean Procurement : सोयाबीन खरेदीला धाराशिवमध्ये वेग

Mahayuti Press Conference : महाराष्ट्रातील हा ऐतिहासिक विजय असून लाडक्या बहिणींनी अंडरकरंट दिला; महायुतीच्या पत्रकार परिषदेतून शिंदे, फडणवीस, अजित पवार यांची मविआवर टीका

Onion Cultivation : एक लाख हेक्टरपर्यंत पोहोचले कांदा लागवड क्षेत्र

SCROLL FOR NEXT