Bedana Market  Agrowon
ॲग्रो विशेष

Bedana Market : सांगली बाजार समितीतील बेदाणा सौदे सावळीला हलविणार

Team Agrowon

Sangli News : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बेदाण्याचे सौदे सावळी (ता. मिरज) येथे हलवण्याचे नियोजन बाजार समिती आणि असोशिएशनने केले आहे. सावळी येथे असोशिएशन सौद्याचा हॉल बांधणार असून महिन्याभरात काम करून सौदे सुरू करण्याचे नियोजन केले आहे.

यांदर्भात बेदाणा असोशिएशन आणि बाजार समिती अशी एकत्र बैठकही घेण्यात आली होती. परंतु दुसऱ्या गटाची याबाबत नाराजी असल्याने सोमवारी (ता. ३०) दुसरी बैठक घेण्यात येणार आहे. त्यामुळे बेदाण्याचे सौदे कुठे होणार याबाबत सर्वांना उस्तुकता लागली आहे.

बाजार समितीने सावळी येथील साडेतेरा एकर जमीन १३ कोटी रुपयांना खरेदी केली आहे. ती जागा विकसित करण्यासाठी पाच कोटी खर्च बाजार समिती प्रशासनाने केले आहेत. या वादग्रस्त जागेबाबत चौकशी अधिकाऱ्यांनी बाजर समितीसाठी योग्य नाही.

उच्चदाब वाहिनी असल्याने जागा विकसित करण्यासाठी अडचणी येणार आहेत, असा ठपकाही ठेवला आहे. या परिस्थितीमध्ये सांगलीचे बैदाणे सौदे सावळीला कशासाठी आणि कुणाच्या स्वार्थासाठी हलविले जात आहेत, असा आरोपही काही बेदाणा व्यापाऱ्यांनी केला आहे.

सांगली बाजार समितीतील बेदाणा सौदे सावळीला कोणत्याही परिस्थितीत हलवण्याची आवश्यकता नाही. सांगलीतील बेदाणा सौद्यांची जागा शेतकरी आणि व्यापारी यांच्यासाठी सोयीची आहे. यामुळे बेदाणा सौदे सावळीला हलवू नये, अशी भूमिका बहुतांश बेदाणा व्यापारी आणि शेतकऱ्यांनी घेतली आहे.

दुसऱ्या बाजूला काही मोठ्या व्यापाऱ्यांनी त्यांच्या सोयीसाठी सौदे सावळीला घेऊन जाण्यासाठी पुढाकार घेतला आहे. ऐवढेच नव्हे तर सौद्यांसाठी शेडसह तेथील मुलभूत सुविधा असोशिएशनतर्फे करण्याची त्यांनी तयारी दर्शवली आहे. या खर्चालाही बेदाणा असोशिएशच्या काही पदाधिकाऱ्यांचा विरोध आहे.

सांगली बाजार समितीतील बेदाणा सौद्याची जागा अपूर्ण आहे. म्हणून बेदाणा असोशिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी खर्च करून सावळीला सौदे घेऊन जाण्याची तयारी केली आहे. काही व्यापाऱ्यांनी यासाठी विरोध केला आहे. या व्यापाऱ्यांची सोमवारी (ता. ३०) बैठक घेऊन त्यांचीही भूमिका घेतली जाणार आहे, अशी माहिती बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : कांदा दरात काहिशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, कांदा, तसेच काय आहे हरभरा दर?

Maharashtra Rain Alert : राज्यात पावसाचे वाढण्याचा अंदाज; मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज

GIS System : ‘जीआयएस’ देऊ शकते नैसर्गिक आपत्तीची पूर्वसूचना

Red Chilli Farming : लाल मिरचीसाठी प्रसिद्ध वाढोणा बाजार गाव

PM SaurGram : टेकवडी झाले ‘पीएम सौरग्राम’

SCROLL FOR NEXT