Paddy Farming Management Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy Crop Pest Control: भात पिकावरील किडींचे व्यवस्थापन

Rice Crop Protection: भात पिकाच्या संरक्षणासाठी वेळेवर किड व्यवस्थापन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. गादमाशी, खोडकिडीपासून ते लष्करी अळीपर्यंत प्रत्येक कीडीसाठी कृषी तज्ज्ञांनी दिलेल्या उपाययोजना शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरतील.

Team Agrowon

पुष्पक बोंथीकर, किशोर झाडे, मोहितकुमार गणवीर

Solutions provided by agricultural experts: भात पिकाची पुनर्लागवड बहुतांश ठिकाणी पूर्ण होत आली आहे. जिथे अद्याप कोणत्याही कारणामुळे भात पुनर्लागवड राहिलेली आहे, ती शक्य तितक्या लवकर पूर्ण करून घ्यावी. भात पिकामध्ये सुरुवातीच्या अवस्थेमध्ये येणाऱ्या किडींचे व्यवस्थापन वेळीच करणे गरजेचे आहे.

खोडकिडा

खोडकिडीचा अधिक प्रादुर्भाव असलेल्या प्रदेशामध्ये खोडकीड प्रतिकारक भात जातींच्या (उदा. साकोली-८, सिंदेवाही-५) लागवडीवर भर द्यावा.

रोवणीपूर्वी रोपांची मुळे क्लोरपायरिफॉस (२० टक्के प्रवाही) १ मि.लि. प्रति लिटर पाणी या द्रावणात १२ तास बुडवून ठेवावीत. नंतर रोवणी करावी.

ट्रायकोग्रामा जॅपोनिकम हे परोपजीवी कीटक हेक्टरी ५०,००० या प्रमाणात दर ७ दिवसाचे अंतराने ३ ते ४ वेळा सोडावे. जैविक घटक सोडण्यापूर्वी व सोडल्यानंतर ३ ते ४ दिवस कोणत्याही कीडनाशकांची फवारणी टाळावी.

शेतात ५ टक्के कीडग्रस्त फुटवे दिसताच, फवारणी प्रती लिटर पाणी

ॲझाडिरेक्टीन (०.१५ टक्के) ३० ते ५० मि.लि. किंवा कार्बोसल्फान (२५ टक्के) १.६ मि.लि. किंवा

फिप्रोनिल (०.३ टक्के दाणेदार) १६.६७ किलो प्रती हेक्टर या प्रमाणे बांधीमध्ये टाकावे.

पुढील हंगामातील प्रादुर्भाव टाळण्यासाठी भाताची (धानाची) कापणी जमिनीलगत करावी.

भात कापणीनंतर वाफसा असताना नांगरट करून धसकटे गोळा करून नष्ट करावी.

व्यवस्थापन

भातावरील खोड किडीच्या व्यवस्थापनाकरीता रोवणी झाल्यापासून ३० दिवसांनी ट्रायकोग्रामा जॅपोनिकम या परोपजीवी किटकाची अंडी हेक्टरी १,६०,००० (८ कार्ड) या प्रमाणात एकूण सहा वेळेला दर आठवड्याच्या अंतराने प्रसारित करावेत.

पुनर्लागवडीनंतर ६० ते ७० दिवसांनी खोडकिडा व पाने गुंडाळणाऱ्या अळीच्या व्यवस्थापनासाठी सर्व्हेक्षण करावे. जर शेतात खोडकिडा (१० टक्के गाधेमर) किंवा पाने गुंडाळणाऱ्या अळीने (जिवंत अळीसह २ प्रादुर्भावग्रस्त पाने, चुड) ही आर्थिक नुकसान पातळी गाठलेली असल्यास किडीच्या व्यवस्थापनासाठी कारटॅप हायड्रोक्लोराइड (५० टक्के एस.पी.) १.२ ग्रॅम प्रती लिटर पाणी या प्रमाणे फवारणीची शिफारस करण्यात आली आहे.

गादमाशी

प्रतिकारक जाती उदा. सिंदेवाही-२००१ साकोली-८, व पी. के. व्ही. गणेशची लागवड करावी.

गादमाशी प्रवण क्षेत्रामध्ये पानावरील गादमाशीचा प्रादुर्भाव कमी करण्याकरिता शिफारशीत तारखेच्या १५ दिवस लवकर रोवणी (२ ते २० जुलै दरम्यान) करण्यात यावी.

गराडीची पाने १.५० टन प्रति हेक्टर याप्रमाणात चिखलणी वेळी शेतात मिसळावीत. यामुळे तुडतुडे आणि खोडकिडीचा प्रादुर्भावसुद्धा कमी होतो.

सभोवतीच्या पूरक वनस्पतींचा (उदा. देवधान) नाश करावा.

कीडग्रस्त रोपे काढून नष्ट करावीत.

गादमाशीप्रवण क्षेत्रात रोवणीनंतर १० आणि ३० दिवसांनी आणि उर्वरित प्रदेशांमध्ये ५ टक्के चंदेरी पोंगे इतका प्रादुर्भाव आढळताच, कार्बोफ्युरॉन (३ टक्के दाणेदार) २५ किलो प्रति हेक्टरी बांधीमध्ये ७ ते १० सें.मी. (२ ते ३ इंच) पाणी असताना मिसळावे. बांधीतील पाणी चार दिवसपर्यंत बाहेर काढू नये.

तुडतुडे

तपकिरी तुडतुड्यांना प्रतिकारक जाती ः पीकेव्ही गणेश, सिंदेवाही-२००१

चिखलणीच्या वेळी बांधीत गराडीची पाने १.५० टन प्रति हेक्टरी या प्रमाणात मिसळावी, त्यामुळे तुडतुड्यांचा प्रादुर्भाव कमी होतो

रोपांची पुनर्लागवड शिफारशीत अंतरावर (२० × १५ किंवा २० बाय २० सें.मी.) करावी.

पट्टा पद्धतीचा अवलंब करावा. म्हणजेच १० ओळी किंवा २ मीटरनंतर ३० सें. मी. अंतर सोडावे.

रोपे अतिशय दाट लावू नये. जास्त दाट लागवड झाल्यास तुडतुड्याचा प्रादुर्भाव वाढण्यास मदत होते.

पिकामध्ये मित्र किटकांच्या संवर्धनासाठी भातशेताच्या बांधावर झेंडू किंवा चवळी पिकाची लागवड करावी.

शिफारशीपेक्षा अधिक नत्र खताचा वापर करू नये.

प्रकाश सापळे किंवा चिकट सापळ्यांचा वापर करावा.

प्रादुर्भाव झाल्यास बांधीतील पाणी सोयीनुसार ३ ते ४ दिवसांसाठी बाहेर सोडावे.

तुडतुड्यांचा प्रादु‌र्भाव असल्यास नियंत्रणासाठी, मेटारायझियम ॲनिसोप्ली (१.१५ टक्का भुकटी) या बुरशीजन्य कीटकनाशकाचा २.५ किलो प्रति हेक्टर या प्रमाणात बांधीमध्ये वापर करावा.

रासायनिक कीटकनाशकांची अनावश्यक फवारणी टाळून मित्रकीटकांचे संवर्धन व संरक्षण करावे.

तुडतुड्यांनी आर्थिक नुकसानीची पातळी (फुटव्याच्या वेळी १० तुडतुडे किंवा लोंबीच्या पुढील अवस्थेत ५-१० तुडतुडे प्रति चुड) ही ओलांडली असल्यास नियंत्रणासाठी, फवारणी (प्रमाण प्रति लिटर पाणी)बुप्रोफेजीन (२५ टक्के प्रवाही) १.६ मि.लि. किंवा फिप्रोनिल (५ एस.सी.) २ मि.लि. किंवा

फ्लोनिकॅमीड (५० टक्के) ०.३ ग्रॅम.

तुडतुड्यांच्या प्रभावी आणि किफायतशीर व्यवस्थापनाकरीता बांधीत दोरीने ओळीमध्ये

रोवणीच्या (२० x १५ सें.मी.) प्रत्येक १० ओळी (किंवा २ मीटर) नंतर ३० सें.मी. अंतराचा पट्टा सोडावा.

तुडतुड्यांचा प्रादु‌र्भाव दिसताच, फवारणी (प्रमाण प्रती लिटर पाणी)

फ्लोनिकॅमिड (५० टक्के डब्ल्यु. जी.) ०.३ ग्रॅम व त्यानंतर १५ दिवसांनी फिप्रोनिल (५ टक्के एस.सी.) २ मि.लि.

धान पिकावरील तपकिरी तुडतुड्यांच्या प्रभावी व्यवस्थापनाकरीता किडींनी आर्थिक नुकसानीची पातळी गाठताच, फवारणी (प्रमाण प्रति लिटर पाणी)

पहिली फवारणी फ्लोनिकॅमिड (५० टक्के डब्ल्यू.जी.) ०.३ ग्रॅम व

पहिल्या फवारणीनंतर १५ दिवसांनी फवारणी पायमेट्रोझीन (५० टक्के डब्ल्यू.जी.) ०.६ ग्रॅम.

लष्करी अळी

लष्करी अळी ही पिकाच्या रोपवाटिकेत, रोवणीनंतरच्या काळात व पीक पक्वतेवेळी नुकसान करतात. कमी प्रमाणात प्रादुर्भाव असल्यास अळ्या दिवसा झाडाचे बुंध्यात, ढेकळाखाली, दगडाखाली, बांधीत पाणी नसतांना ढिगाऱ्याखाली लपून राहतात. रात्री पिकाचे नुकसान करतात. जंगल क्षेत्र किंवा पाटाचे बांध या ठिकाणी या किडीचे प्रजनन होऊन लगतच्या भात रोपवाटिका, लागवड (रोपणी) क्षेत्र अथवा पीक पक्वतेवेळी प्रादुर्भाव दिसतो. या किडीच्या अळ्या लोंब्या कुरतडून शेतात लोब्यांचा सडा पाडतात.

या किडीच्या नियंत्रणासाठी रोपवाटीकेत अथवा धान बांधीत पाणी साठविणे, बांध साफ करणे.

पिकावरून दोर किंवा झाडाच्या फांद्या आडव्या फिरवून लष्करी अळ्या पाडाव्यात. पाण्यात बेडकांच्या संख्या योग्य प्रमाणात असल्यास बेडून या पडलेल्या अळ्या खाऊन टाकतात.

किडीची कोषावस्था नष्ट करण्यासाठी भाताची कापणी झाल्यावर खोलवर नांगरणी करून धसकटे जाळून नष्ट करावी.

पाने गुंडाळणारी अळी

पाने गुंडाळणारी अळी, बेरड, सुरळीतील अळी व शिंगे अळी यांच्या नियंत्रणासाठी,

बिव्हेरीया बॅसियाना (१.१५ टक्का) २.५ किलो/हेक्टर किंवा फवारणी प्रति लिटर पाणी ॲझाडिरेक्टीन (०.१५ टक्का) ३ ते ५ मि.लि. किंवा आर्थिक नुकसानीची पातळी गाठताच, इंडोक्साकार्ब (१५.८ टक्के प्रवाही) ०.४ मि.लि.

पुष्पक बोंथीकर,(विषय विशेषज्ञ- पीक संरक्षण) ९७६७४००४५६

मोहितकुमार गणवीर ९०४९७०८८७८

कृषी विज्ञान केंद्र, गडचिरोली

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soyabean Crop Damage: सोयाबीनवर कीटकनाशक फवारलं, सोयाबीन जळालं; केंद्रीय कृषिमंत्र्याचे कारवाईचे आदेश

Satara DCC Bank : सातारा जिल्हा बॅंकेची वार्षिक सभा खेळीमेळीत

Satara ZP Election : सातारा ‘झेडपी’साठी २६ लाख ६६ हजार मतदार

Rain Crop Damage : शेती पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा; मदत व पुनर्वसन मंत्री जाधव यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

Crop Loss Compensation : भरपाईप्रश्‍नी जिल्हाधिकारी करणार हस्तक्षेप

SCROLL FOR NEXT