Pune News: राज्याच्या निविष्ठा व गुणनियंत्रण संचालकपदी सुनील बोरकर यांची तात्पुरती नियुक्ती करण्यात आली आहे. गुणनियंत्रण संचालकपदावरुन अशोक किरनळ्ळी २८ फेब्रुवारी रोजी निवृत्त झाले. त्यामुळे रिक्तपदाची सूत्रे देण्याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी कृषी आयुक्तालयाने राज्य शासनाकडे विचारणा केली होती..संचालकपदाची तात्पुरती सूत्रे बोरकर यांच्याकडे देण्याचा निर्णय कृषी मंत्रालयाने घेतला. या निर्णयाची लेखी माहिती उपसचिव अंबादास चंदनशिवे यांनी आयुक्त सूरज मांढरे यांना दिली. त्यामुळे कृषी आयुक्तालयाच्या आस्थापना विभागाचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी ज्ञानचंद्र गित्ते यांनी श्री. बोरकर यांच्या तात्पुरत्या नियुक्तीचे आदेश जारी केले. त्यांच्या पूर्णवेळ नियुक्तीबाबत शासनाकडून लवकरच मंजुरी येण्याची शक्यता आहे..Sunil Borkar : गुणनियंत्रण संचालकपदी सुनील बोरकर यांची नियुक्ती.कृषी आयुक्तालयाच्या आत्मा विभागाचे पूर्णवेळ संचालक असलेले श्री. बोरकर आता ‘आत्मा’सह ‘गुणनियंत्रण’चे देखील काम सांभाळणार आहेत. या नियुक्तीनंतर त्यांचे निविष्ठा उद्योगातील प्रतिनिधी, क्षेत्रीय गुणनियंत्रण अधिकारी तसेच आयुक्तालयातील इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अभिनंदन होत आहे. .Sunil kedar : नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणात सुनील केदार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता.श्री. बोरकर हे महाराष्ट्र लोक सेवा आयोगाच्या कृषी सेवा वर्ग एकमधील १९९३ च्या तुकडीचे आहेत. २०१९ ते २२ या कालावधीत ते राज्याचे मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारीपदी कार्यरत होते. त्यानंतर त्यांची नियुक्ती गुणनियंत्रण संचालकपदी झाली. पुढच्या टप्प्यात राज्य शासनाने संचालकपदांच्या कामकाजांमध्ये पुन्हा मोठे बदल केले. यात श्री. किरनळ्ळी यांना ‘गुणनियंत्रण’ विभागाचे तर श्री. बोरकर यांना ‘आत्मा’चे संचालकपद मिळाले होते..पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर श्री. बोरकर यांनी सांगितले, की राज्याच्या निविष्ठा उद्योगातील अडचणी विचारात घेत गुणनियंत्रण विभागाच्या कामाचा प्राधान्यक्रम ठरविला जाईल. तसेच, शेतकऱ्यांना दर्जेदार निविष्ठांचा वेळेत पुरवठा होण्यासाठी क्षेत्रीय गुणनियंत्रण यंत्रणेला प्रोत्साहन दिले जाईल..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.