Fertilizer Agrowon
ॲग्रो विशेष

Fertilizer Black Marketing : खतांची साठेबाजी होणार नाही याची दक्षता घ्या

Rabi Season : या रब्बी हंगामात शेतकऱ्यांना खतांचा पुरवठा वेळेत करण्यात यावा. पुरवठा वेळेत करताना खतांची साठेबाजी होणार नाही याची कृषी विभागाने दक्षता घ्यावी, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी दिले.

Team Agrowon

Washim News : या रब्बी हंगामात शेतकऱ्यांना खतांचा पुरवठा वेळेत करण्यात यावा. पुरवठा वेळेत करताना खतांची साठेबाजी होणार नाही याची कृषी विभागाने दक्षता घ्यावी, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात जिल्हास्तरीय कृषी निविष्ठा सनियंत्रण समितीच्या सभेत अध्यक्ष म्हणून श्रीमती बुवनेश्वरी एस. बोलत होत्या.

सभेला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरिफ शहा, प्रभारी कृषी विकास अधिकारी गणेश गिरी, मोहीम अधिकारी भागडे, सर्व पंचायत समितीचे कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, रासायनिक खत कंपन्यांचे प्रतिनिधी, खते व बियाणे विक्रेते प्रामुख्याने उपस्थित होते.

जिल्हाधिकारी म्हणाल्या, की सर्व खत कंपन्यांनी खतांचा पुरवठा नियोजनानुसार वेळेत करावा. रब्बी हंगामात किती खतपुरवठा करणार याबाबतचे नियोजन दोन दिवसांत सादर करावे. निविष्ठा विक्रेत्यांनीसुद्धा मटेरियल कंपनीकडून स्वीकारू नये.

रास्त भावात खते-बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावे. कोणी जास्त दराने विक्री केल्यास कृषी विभागाने तत्काळ कारवाई करावी. शेतकऱ्यांना रब्बी हंगामात आवश्यक खते व बियाणे कसे उपलब्ध होतील याबाबतचे नियोजन कृषी विभाग, सर्व कंपनी प्रतिनिधी व विक्रेते यांनी करावे, असे त्यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT