Bauxite in Kolhapur agrowon
ॲग्रो विशेष

Bauxite in Kolhapur : कोल्हापुरात विनापरवाना बॉक्साईटची राजरोस चोरी, ५०० ट्रक माल उचलला

Kolhapur Bauxite Theft : कोल्हापूर जिल्ह्यात होत असलेल्या बेकायदेशी बॉक्साईटच्या उत्खननाला कोणाचे बळ आहे याबाबत चर्चा सुरू आहे.

sandeep Shirguppe

Kolhapur Bauxite News : कोल्हापूर जिल्ह्यातील दुर्गमानवाड, तळगाव परिसरातील डोंगरांमध्ये विनापरवाना बॉक्साईटची राजरोस चोरी सुरू आहे. तळगाव डोंगराच्या कुशीत असलेल्या पाझर तलावाला लागून मोठ्या प्रमाणात बॉक्साइट उत्खनन केल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान जिल्ह्यात होत असलेल्या बेकायदेशी बॉक्साईटच्या उत्खननाला कोणाचे बळ आहे याबाबत चर्चा सुरू आहे.

दुर्गमानवाड आणि तळगाव परिसरातील शेतकऱ्यांनी महसूल विभागास केलेल्या तक्रारीवरून याची दखल घेतली आहे. दुर्गमानवाड परिसरातील चाफेवाडी, धुमाळवाडी, बेरकळवाडी या परिसरात असलेल्या पडीक जमिनीमधून जेसीबीद्वारे उत्खनन करून बॉक्साइट रातोरात चोरणारी एक टोळी कार्यरत आहे.

पावसाळा संपल्यानंतर शासकीय सुटीच्या दिवशी उत्खनन करून रातोरात ट्रक भरून बॉक्साइटचे दगड व माती नेली जात आहे. पाझर तलावाच्या भिंतीवरूनच गेलेल्या मार्गाने गेल्यास येथे तब्बल पाच ते सहा एकराचा परिसर खणलेला दिसून येतो.

या माळावरून सुमारे ४०० ते ५०० ट्रक इतका माल उचलल्याचे स्पष्ट दिसत आहे. पिकायोग्य जमीन करायची झाल्यास ती सपाटीकरण करावे लागते, मात्र निव्वळ बॉक्साईटचे दगड नेण्यासाठी हे खणन केल्याचे स्पष्ट होत आहे. स्थानिक नागरिकांनी याबाबत तक्रार केल्यानंतर महसूल विभागाने तपास केला असून कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.

तीन ठिकाणी उत्खनन झालेले आहे. मंडल अधिकारी व तलाठ्यांनी तपास केला आहे. पंचनामा झाला असून, संबंधितांवर कारवाई करणार आहे.

अनिता देशमुख, तहसीलदार, राधानगरी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT