E-Peek Pahani Agrowon
ॲग्रो विशेष

E Peek Pahani : ई-पीक नोंदणीतील अडथळे कायम

Crop Registration : परभणी जिल्ह्यात खरिपाची ५ लाख २५ हजार १५० हेक्टरवर पेरणी झाली आहे. शुक्रवारपर्यंत (ता.१६) १ लाख ३५ हजार १९१ शेतकऱ्यांनी १ लाख ७१ हजार २४ हेक्टरवरील ई-पीक पाहणी केली.

Team Agrowon

Parbhani News : जिल्ह्यात शुक्रवारपर्यंत (ता.१६) १ लाख ३५ हजार १९१ शेतकरी खातेदारांनी १ लाख ७१ हजार २४ हेक्टर क्षेत्रावरील पिकांची ई-पीक पाहणी केली आहे. ई-पीक पाहणी अॅपद्वारे पीक पेरा नोंदणी प्रक्रियेत कमजोर नेटवर्क तसेच सर्व्हरशी कनेक्ट होण्यास विलंब हे अडथळे दूर करण्यास सर्व संबंधित दुर्लक्ष करत असल्यामुळे ई-पीक पाहणीची गती संथ आहे.

पेरणी क्षेत्र व ई- पाहणी पेरा नोंदणी क्षेत्र यांच्यात अद्याप मोठा फरक आहे. परभणी जिल्ह्यात खरिपाची ५ लाख २५ हजार १५० हेक्टरवर पेरणी झाली आहे. शुक्रवारपर्यंत (ता.१६) १ लाख ३५ हजार १९१ शेतकऱ्यांनी १ लाख ७१ हजार २४ हेक्टरवरील ई-पीक पाहणी केली.

त्यात चालू पड क्षेत्र २१८ हेक्टर आहे. ई-पीक पाहणी अॅपद्वारे शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतातील पीक पेऱ्याची नोंद केल्यानंतर स्थळ काळानुसार (रिअल टाइम डाटा) पिकांचे पेरणी क्षेत्र निश्चित होते.

विविध पिकांच्या पेऱ्याबाबतची ही माहिती पीकविमा परतावा मंजूर करणे, नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पीक नुकसानीबद्दल आर्थिक मदत देणे, किमान आधारभूत किमतीसह शेतीमालाचे आयात-निर्यात धोरण ठरविणे आदीसाठी उपयोगी पडते. तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी सर्व संबंधित विभाग, यंत्रणा दाखवीत असलेली उदासीनता यामुळे ई-पीक पाहणी अॅपव्दारे पीक पेरा नोंदणी प्रक्रिया गतिमान नाही.

परभणी जिल्हा ई-पीकपाहणी स्थिती (क्षेत्र हेक्टरमध्ये)

तालुका शेतकरी संख्या ई-पीकपाहणी क्षेत्र

परभणी २४५०० ३२४४५

जिंतूर ३०४२९ ४१३५४

सेलू १३५०३ १७४६०

मानवत ९७३४ १३०३१

पाथरी ९९७३ १२६४९

सोनपेठ ६८७१ ८३५०

गंगाखेड १२११७ १४४९६

पालम १०४४४ ११६२७

पूर्णा १७६२० १९४११

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT