Sugar Cane Agrowon
ॲग्रो विशेष

Crushing Season : गाळपात ‘बारामती ॲग्रो’ची आघाडी, तर साखर उताऱ्यात ‘दौंड शुगर’ची

Baramati Agro : पुणे जिल्ह्यात गाळपामध्ये शेटफळगढे (ता. इंदापूर) येथील बारामती ॲग्रो कारखान्याने आघाडी घेतली असून, चालू हंगामापर्यंत (ता. ५) ४ लाख ७९ हजार ३७० टन एवढे उच्चांकी गाळप केले आहे.

Team Agrowon

Pune News : शेटफळगढे, ता. इंदापूर : पुणे जिल्ह्यात गाळपामध्ये शेटफळगढे (ता. इंदापूर) येथील बारामती ॲग्रो कारखान्याने आघाडी घेतली असून, चालू हंगामापर्यंत (ता. ५) ४ लाख ७९ हजार ३७० टन एवढे उच्चांकी गाळप केले आहे.

त्याच्या पाठोपाठ दौंड शुगर कारखान्याने ४ लाख ४४ हजार ८९० टन गाळप करून जिल्ह्यात दुसरा क्रमांक घेतला आहे. तर, साखरेच्या उताऱ्यात दौंड शुगर कारखान्याने १०.७६. एवढा उतारा घेत आघाडी घेतली आहे.

बारामती ॲग्रो कारखान्याने १०.६० एवढा साखरेचा उतारा घेत दोन नंबरला आघाडी घेतली आहे. जिल्ह्यात गाळपात आणि उताऱ्यात खासगी कारखान्यानेच आघाडी घेतली आहे. सहकारी कारखान्यात गाळपामध्ये सोमेश्वर कारखान्याने बाजी मारली आहे.

सोमेश्वर कारखान्याने पाच डिसेंबरपर्यंत २ लाख ९६ हजार ४६० टन (उतारा १०.२७), तर त्यापाठोपाठ माळेगाव कारखान्याने २ लाख ७३ हजार ६९२ टन (उतारा ९.४६) गाळप केले आहे.

या पाठोपाठ भीमाशंकर कारखान्याने २ लाख १० हजार ९८० टन गाळप, (उतारा ९.६९ ), विघ्नहर १ लाख ९४ हजार ५७० टन गाळप (उतारा ९.५१), श्रीनाथ म्हस्कोबा १ लाख ५० हजार ६५४ टन, छत्रपती कारखान्याने १ लाख ९ हजार ६४६ टन (उतारा ९.४८), संत तुकाराम १ लाख ३ हजार ११० टन (उतारा १०.२४ ) तर कर्मयोगी कारखान्याने १ लाख ७ हजार ६०० टन एवढे गाळप केले आहे.


प्रतिदिन गाळपामध्ये सध्या बारामती ॲग्रो आघाडीवर असून १६ हजार टन प्रतिदिन गाळप करीत आहे. या कारखान्याने पहिला हप्ताही २९०० रुपये जाहीर केलेला आहे. सहकारी कारखान्यात छत्रपती कारखान्याने ३००० रुपये पहिला हप्ता जाहीर करून आघाडी घेतलेली आहे. चालू हंगामात दुष्काळी परिस्थितीमुळे उसाचे क्षेत्र घटल्याने साखरेचे उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी होणार असल्याचे चित्र आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Protest: शेतकरी कर्जमाफी, ओला दुष्काळ जाहीर करा

Crop Insurance Compensation: तातडीने विमा भरपाईसाठी कंपन्यांना निर्देश देऊ

APMC Pune: शेतीमाल प्रक्रिया मूल्यवर्धन प्रकल्प उभारणार

Heavy Rainfall: नैसर्गिक आपत्तीतून वाचलेल्या कपाशीची वाताहत

Cooperative Bank Award: उत्कृष्ट सहकारी संस्थांना सन्मानाची ढाल प्रदान

SCROLL FOR NEXT