PFME Scheme
PFME Scheme Agrowon
ॲग्रो विशेष

PFME Scheme : विदर्भात ‘पीएफएमई’च्या अंमलबजावणीत बॅंकांचा खोडा

Vinod Ingole

Amravati News : पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजने (पीएफएमई)ला (Prime Minister's Micro Food Processing Industries Scheme) विदर्भात चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र या योजनेच्या अंमलबजावणीत बॅंकांनीच खोडा घातल्याचे धक्‍कादायक वास्तव समोर आले असून, अमरावती विभागातील (Amravati Division) पाच जिल्ह्यांत तब्बल १२५३ प्रस्ताव फेटाळण्यात आले आहेत. त्यानंतरही बॅंकांकडे १२०० प्रस्ताव प्रलंबित आहेत.

अन्न प्रक्रियेवर आधारित व्यवसायाच्या उभारणीकरिता प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना राबविली जात आहे. त्या अंतर्गत लाभार्थ्यांना व्यवसाय उभारणीसाठी अनुदान देण्याची तरतूद आहे.

संबंधिताने त्याकरिता बॅंकेच्या माध्यमातून कर्ज प्रकरण मंजूर करून घेणे गरजेचे आहे. त्यानंतर लाभार्थी अनुदान हे बॅंक खात्यात जमा केले जाते.

अमरावती विभागातील अकोला, वाशीम, बुलडाणा, यवतमाळ आणि अमरावती या पाच जिल्ह्यांमध्ये या योजनेच्या अंमलबजावणीत बॅंकांनीच आडकाठी आणले आहे. अमरावती विभागात कर्ज प्रकरणे फेटाळण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे.

त्यामुळे योजनेच्या अंमलबजावणीला खीळ बसली आहे. अमरावती विभागाला प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेसाठी १०१८ प्रकरणाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र बॅंकांकडे सादर १२५३ प्रस्ताव फेटाळण्यात आले. परिणामी योजनेची अंमलबजावणीच वांद्यात आली आहे.

यामध्ये अमरावती जिल्ह्यातील १७९, बुलडाणा ४३३, अकोला १८५, वाशीम १४८ तर यवतमाळ जिल्ह्यातील ३०८ कर्ज प्रकरणांचा समावेश आहे. बॅंकांकडे सद्यःस्थितीत १२०० प्रकरणे मंजुरीसाठी प्रलंबित आहेत.

त्यामध्ये अमरावती २७४, बुलडाणा ३८८, अकोला १९५, वाशीम १७७, तर यवतमाळ जिल्ह्यातील १६६ प्रस्तावांचा समावेश आहे. बॅंकांकडून योजनेच्या अंमलबजावणीबाबत असहकार्याचे धोरण राबविण्यात आल्याने योजनांचा वादात आली आहे.

अंमलबजावणीला सहकार्य मिळावे यासाठी कृषी विभागाकडून खास सप्ताह पाळला जाणार आहे. त्या माध्यमातून बॅंक अधिकाऱ्यांशी संवाद साधत प्रस्ताव फेटाळण्यामागील त्यांच्या स्तरावरील अडचणी जाणून घेण्यता येणार आहेत. तसेच अधिकाधिक प्रस्ताव मान्य व्हावे याकरिता देखील प्रयत्न केला जाणार आहे.

अमरावती विभागाला १०१८ प्रस्ताव मंजुरीचे उद्दिष्ट होते. आजपर्यंत ६४१ प्रस्तावांना मान्यता मिळाली आहे. १२५३ प्रस्ताव बॅंकस्तरावरून फेटाळण्यात आले. सोबतच १२०० प्रस्ताव बॅंकांकडे मंजुरीसाठी प्रलंबित आहेत. त्याची कारणे जाणून घेण्यासाठी खास अभियान या आठवड्यात राबविले जाईल व प्रस्ताव मंजुरीला गती देण्याचा प्रयत्न असणार आहे.
किसन मुळे, विभागीय कृषी सहसंचालक, अमरावती

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rice Research : अधिक ‘बी१’ जीवनसत्त्व असलेला भात विकसित

Waghad Project : ‘वाघाड’ने घडविला कायापालट

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

Road Work Update : पाणंद रस्त्यांची ८५० हून अधिक कामे ठप्प

Mathadi Worker Protest : माथाडी कामगारांचे सरणावर बसून आंदोलन

SCROLL FOR NEXT