Crop Loan Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Loan Distribution : मार्चअखेरचं लक्ष्य गाठा ; बँकांनी पीककर्ज वाटप पूर्ण करावे

Agriculture Loan : मार्चअखेर सर्व बँकांनी पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट १०० टक्के पूर्ण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले.

Team Agrowon

Kolhapur News : मार्चअखेर सर्व बँकांनी पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट १०० टक्के पूर्ण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले. जिल्हा सल्लागार समितीची जिल्हास्तरीय आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात झाली.

त्या वेळी ते बोलत होते. बँक ऑफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक राजीवकुमार सिंह, प्रबंधक आर्थिक समावेश आणि विकास रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे विशाल गोंडके, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जी. एम. शिंदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगारे, अग्रणी जिल्हा बँकेचे व्यवस्थापक गणेश गोडसे आदी उपस्थित होते.

श्री. येडगे म्हणाले, की जिल्ह्यातील सर्व बँकांनी उद्योजकांना वेळेत आणि आवश्यक तेवढा कर्जपुरवठा करून जिल्ह्याला अग्रस्थानी आणावे. शासकीय योजनेअंतर्गत प्रलंबित प्रकरणे येत्या मार्चपर्यंत निकाली काढून सर्व योजनांअंतर्गत उद्दिष्ट पूर्तता बँकानी करावी. सध्या शासनाच्या वतीने १०० दिवसांचा कार्यक्रम राबविला जात आहे. या अंतर्गत प्रत्येक ग्राहकाला उत्कृष्ट सेवा प्रदान करण्यावर बँकांनी भर द्यावा.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शेतकऱ्यांसाठी कोलॅटरल फ्री पीक कर्जाची मर्यादा १.६० लाख रुपयांवरून २ लाख रुपयांपर्यंत वाढविली आहे. तसेच केंद्र शासनाच्या व्याज परतावा योजनेअंतर्गत पीककर्ज मर्यादा ३ लाखांवरून ५ लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात आली असल्याची माहिती अग्रणी बँक व्यवस्थापक गणेश गोडसे यांनी दिली.

डिसेंबर अखेरची आकडेवारी पाहता सर्व बँका मिळून जिल्ह्याचे मार्च २०२५ अखेर उद्दिष्ट पूर्ण करतील’ असा विश्वास बँक ऑफ इंडिया जिल्हा अग्रणी बँकेचे विभागीय व्यवस्थापक, राजीवकुमार सिंह यांनी सर्व बँकांच्या वतीने व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये चढ उतार ; टोमॅटो दर टिकून, केळीला मागणी, आल्याला उठाव तर गवारची आवक टिकून

Sugarcane FRP Dues: थकीत 'एफआरपी'प्रश्नी ८१ साखर कारखान्यांना नोटिसा, सहकारमंत्री बाबासाहेब पाटलांची विधानपरिषदेत माहिती

Cotton Productivity Mission: कापूस उत्पादकता अभियान फसण्याचे संकेत

Rain Update In Maharashtra: कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील ६ जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज 

Crop Insurance: पीकविमा योजनेत शेतकऱ्यांना वेळेत नुकसान भरपाई मिळेना; कृषिमंत्र्यांची कबुली

SCROLL FOR NEXT