Crop Loan Distribution : सातारा जिल्ह्यात पीककर्ज वितरणाचे ८५ टक्के उद्दिष्ट पूर्ण

Crop Loan : जिल्ह्याला २०२४-२५ साठी पीक कर्ज वितरणाचे उद्दिष्ट तीन हजार ६०० कोटींचे असून, १५ मार्चअखेर तीन हजार ६४ कोटी १८ लाखांचे पीक कर्ज वितरित केले आहे. यातून ८५ टक्के उद्दिष्टपूर्ती झाली आहे.
Crop Loan
Crop LoanAgrowon
Published on
Updated on

ॲग्रोवन वृत्तसेवा

Satara News : सातारा : जिल्ह्याला २०२४-२५ साठी पीक कर्ज वितरणाचे उद्दिष्ट तीन हजार ६०० कोटींचे असून, १५ मार्चअखेर तीन हजार ६४ कोटी १८ लाखांचे पीक कर्ज वितरित केले आहे. यातून ८५ टक्के उद्दिष्टपूर्ती झाली आहे. मार्चअखरेपर्यंत पीककर्ज वितरणाची रक्कम वितरित करून बँकांनी शंभर टक्के उद्दिष्टपूर्ती होईल, यासाठी सर्वतोपरी दक्षता घ्यावी.

उद्योगांसाठीची कर्ज प्रकरणे रोजगार निर्मितीसाठी असून, याची जाणीव ठेवून सकारात्मकतेने प्रकरणे मार्गी लावा, अशी सूचना जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात बँकर्स समितीची बैठक जिल्हाधिकारी श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी जिल्हा उपनिबंधक संजयकुमार सुद्रीक, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक नितीन तळपे, रिझर्व्ह बँकेचे विजय कोरडे, नाबार्डचे राजेंद्र चौधरी, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक उमेशचंद्र दंडगव्हाळ उपस्थित होते.

Crop Loan
Crop Loan : ‘रब्बी’त साडेबारशे कोटींवर पीककर्ज वितरणाचे उद्दिष्ट

२०२४-२५ मध्ये जिल्ह्याला खरीप हंगामासाठी दोन हजार ३२० कोटींचे पीक कर्ज वितरणाचे उद्दिष्ट होते. त्या तुलनेत दोन हजार १८९ कोटी ४८ लाख रुपये पीक कर्ज वितरण करून ९४ टक्के उद्दिष्टपूर्ती करण्यात आली आहे. रब्बी हंगामासाठी एक हजार २८० कोटी पीक कर्ज वितरणाचे उद्दिष्ट असून, ८८४ कोटी ७० लाख रुपये वितरित करून १५ मार्चअखेर ६९ टक्के उद्दिष्टपूर्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व बँकांनी त्यांना देण्यात आलेले उद्दिष्ट कोणत्याही स्थितीत पूर्ण होईल, याची काटेकोर दक्षता घ्यावी, अशी स्पष्टता जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी दिली. पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसायाशी संबंधित कर्ज मागणी प्रकरणेही बँकांनी त्वरित मार्गी लावावीत.

या बैठकीत राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (एमएसआरएलएम) अंतर्गत स्वयंसहायता बचत गटांच्या माध्यमातून १८३ कोटी २० लाखांच्या उद्दिष्टाच्या तुलनेत २०७ कोटी नऊ लाख कर्ज वितरण करून जिल्ह्यात उत्तम कामगिरी करण्यात आली आहे.

जिल्हा राज्यात चौथ्या क्रमांकावर

प्राथमिक क्षेत्रांना कर्ज वितरणात जिल्ह्याला ११ हजार ५२२ कोटींचे वार्षिक उद्दिष्ट होते. त्यापैकी डिसेंबरअखेर दहा हजार ५०८ कोटी कर्ज वितरण करून जिल्ह्याने ९१ टक्के उद्दिष्टपूर्ती करत राज्यात चौथ्या क्रमांकावर आला आहे, याबद्दल अभिनंदन करून प्राधान्य क्षेत्रांना कर्ज वितरणाचे उद्दिष्टही शंभर टक्के पूर्ण करावे, असे सूचित केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com