Crop Loan Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Loan : पीककर्ज वाटपात राष्ट्रीयीकृत, खासगी बँकांचा हात आखडता

Kharif Season : यंदाच्या (२०२५) खरीप हंगामात परभणी जिल्ह्यात पीककर्ज वाटप करताना राष्ट्रीयीकृत व खासगी बँकांनी हात आखडता घेतला आहे.

Team Agrowon

Parbhani News : यंदाच्या (२०२५) खरीप हंगामात परभणी जिल्ह्यात पीककर्ज वाटप करताना राष्ट्रीयीकृत व खासगी बँकांनी हात आखडता घेतला आहे. मंगळवार (ता. १५) अखेर पर्यंत ११ राष्ट्रीयीकृत बँकांनी १२ हजार ३३३ शेतकऱ्यांना १५७ कोटी ६७ लाख रुपये (१९.०६ टक्के), तर ५ खासगी बँकांनी ८१५ शेतकऱ्यांना २१ कोटी ५७ लाख रुपये (१५.९६ टक्के) पीककर्ज वाटप केले आहे.

जिल्ह्यात सर्व बँकांनी एकूण ६२ हजार ४१४ शेतकऱ्यांना ५४८ कोटी २२ लाख रुपये (३६.३७ टक्के) पीककर्ज वाटप केले आहे. या वर्षीच्या खरिपात जिल्ह्यातील बँकांना १ हजार ५११ कोटी ६० लाख रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

मंगळवार (ता. १५) अखेर राष्ट्रीयीकृत (व्यापारी) बँकांनी ८२७.३३ कोटी पैकी १५७ कोटी ६७ लाख रुपये, खासगी बँकांनी १३५ कोटी १४ लाख रुपये पैकी २१ कोटी ५७ लाख रुपये, महाराष्ट्र ग्रामीण बँकेने ३३९ कोटी १३ पैकी १८७ कोटी ४१ लाख रुपये, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने २१० कोटी पैकी १८१ कोटी ८६ लाख रुपये पीककर्ज वाटप केले.

त्यात ४ हजार ७०० शेतकऱ्यांना ६५ कोटी ५२ लाख रुपयाचे नवीन पीककर्ज वाटप आहे. एकूण ५७ हजार ७१४ शेतकऱ्यांनी ४८२ कोटी २७० रुपये पीककर्जाचे नूतनीकरण करून घेतले आहे. २०२४ मध्ये १५ जुलै अखेरपर्यंत ६७ हजार ५९९ शेतकऱ्यांना ५१८ कोटी ३७ लाख रुपये (३५.२४ टक्के) पीककर्ज वाटप झाले होते.

Crop Loan

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: हरभरा दरात सुधारणा; केळी दर नरमले, ज्वारीला मागणी कायम, आले दरात सुधारणा तर कांद्याची दरपातळी कायम

Mumbai Rain: मुंबईतील पावसाने २६ जुलै २००५ ची आठवण; अनेक भागात जनजिवन विस्कळीत

Khandesh Cotton Crisis : खानदेशात जिनिंग प्रेसिंग कारखान्यांची धडधड बंद

Crop Insurance Crisis: पीक विम्याकडे शेतकऱ्यांची पाठ; गेल्यावर्षीच्या तुलनेत केवळ २२ टक्के अर्ज

Solapur Power Loss : सोलापूर मंडलाची वीजहानी सर्वाधिक

SCROLL FOR NEXT