Mumbai Apmc Agrowon
ॲग्रो विशेष

Navi Mumbai APMC : मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी नवी मुंबई बाजार समितीत बंद

Marathi Reservation : मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आज बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Swapnil Shinde

APMC Workers Support to Manoj Jarange : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या आंदोलनाला नवी मुंबई एपीएमसी मार्केटने पाठिंबा दिला आहे. सर्व माथाडी कामगारांनी एकत्रित येत एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करत मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आज कांदा बटाटा, दाना आणि मसाला मार्केटमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी कोट्यातून आरक्षण द्यावे, या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी १७ दिवस उपोषण केले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १ महिन्याची मुदत मागितली होती. परंतु सरकारने दिलेल्या आश्वासनानंतर ४० दिवसांनंतर जरांगे यांनी बुधवारपासून ( ता. २४) पुन्हा जालना (Jalana) येथील आंतरवाली सराटी गावात उपोषणाला सुरुवात केली आहे.

जरांगेंच्या उपोषणाला राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे. अनेक मराठा तरुण या आरक्षणासाठी आत्महत्या करत आहेत. मराठा समाज आक्रमक झाला असून जिल्ह्याजिल्ह्यात साखळी उपोषण सुरू केले आहे. तसेच अनेक गावांमध्ये राजकीय नेत्यांना बंदी घालण्यात आली असून ग्रामीण भागातील राजकारण तापले आहे.

या आंदोलनात माथाडी कामगारांनी सहभागी होण्याचा निर्णय घेतला. यामध्ये नवी मुंबई एपीएमसीच्या तीन बाजारपेठा बंद ठेवून पाठिंबा दर्शवला. कांदा बटाटा, दाना आणि मसाला मार्केटमधील व्यवहार पूर्णपणे ठप्प आहे. मात्र, भाजीपाला आणि फळमार्केट सुरु होते. माथाडी कामगारांसह आमदार शशिकांत शिंदे आणि अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी एकदिवसीय लाक्षणिक उपोषणामध्ये सहभागी झाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Massive Agricultural Crisis : बळीराजा उद्ध्वस्त! ८ लाख हेक्टरवरील पिके मातीमोल

Satara Rabi Season : सातारा जिल्ह्यात 'रब्बी'ची केवळ ५ टक्केच पेरणी पूर्ण; पाऊस गायब झाल्याने बळीराजा संकटात!

Nar-Par Girna Project : नार-पार, गिरणा नदीजोड प्रकल्पाला तीव्र विरोध; जमिनी आणि पाणी वाचवण्यासाठी शेतकरी एकवटले!

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

SCROLL FOR NEXT