Banana Export Agrowon
ॲग्रो विशेष

Banana Export : जुन्नर तालुक्यातील केळी आखाती देशात रवाना

Deccan Valley Farmers Producer Company : शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमालाच्या निर्यातीला मदत करण्यासाठी डेक्कन व्हॅली फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी काम करत आहे.

Team Agrowon

Pune News : जुन्नर, आंबेगाव तालुक्यांतील शेतकरी हा दर्जेदार व निर्यातक्षम केळी पिकवत असला तरीही तो स्वतः निर्यात करू शकत नाही. ही समस्या ओळखून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमालाच्या निर्यातीला मदत करण्यासाठी डेक्कन व्हॅली फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी काम करत आहे.

या कंपनीने पहिला केळी कंटेनर सोमवारी (ता. २५) आखाती देशात पाठविण्यात आला. केळी उत्पादक शेतकरी सीमा व विजय थोरात या केळी निर्यातदार दांपत्याच्या हस्ते गणेश पूजन, करून फित कापण्यात आली.

या वेळी तालुका कृषी अधिकारी गणेश भोसले, सह्याद्री फार्मचे संचालक मंगेश भास्कर संचालक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक माउली खंडागळे, यशवंत पतसंस्थेचे चेअरमन महादेव वाघ, अखिल भारतीय भाजीपाला संघाचे अध्यक्ष श्रीराम गाढवे, रमेश कोल्हे, अजय बेल्हेकर, सुनील वामन, मनोज वामन, रवींद्र थोरात, विनायक मुळे, चंद्रकांत गायकवाड, गणेश वाघ, शशिकांत लांडगे, किशोर नेहरकर, अभिजित वामन, राहुल दांगट उपस्थित होते.

स्थानिक पातळीवर एकत्रित काम केल्यास हे शक्य असा विचार ‘ॲग्रोवन’ व ‘सह्याद्री फार्म्स’ सातत्याने मांडत आले होते. याचाच एक भाग म्हणून कृषी विभाग व कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव यांच्या मदतीने डेक्कन व्हॅली फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीने पुणे जिल्ह्यातील जुन्नर आंबेगाव, शिरूर, खेड तालुक्यात केळीचे क्लस्टर उभारण्याचे काम हाती घेतले आहे.

डेक्कन व्हॅली फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी व अभिनव कृषी फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी शाश्वत फार्मिंग फाउंडेशन, हस्ताई फार्मर्स प्रोड्यूसर कं. यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व केळी उत्पादक शेतकऱ्यांना केळी लागवडीपासून शेतीमाल काढणी व प्रतवारी, पॅकिंग, ब्रॅडिंग, प्री-कूलिंग, शेतीमाल साठवण करण्यासाठी शीतगृह व वातानुकूलित वाहतूक व्यवस्था जुन्नर तालुक्यात उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

यासाठी सह्याद्री फार्म्सने विक्री व्यवस्थापनची जबाबदारी घेतली आहे. हे केळी क्लस्टर उभारण्यासाठी विकास आराखडा तयार केला आहे. यासाठी ‘सकाळ, ॲग्रोवन’ माध्यम समूह हे ‘ॲग्रोवन स्मार्ट व्हिलेज’द्वारे शेतकरी समूहाला मदत करत आहेत. या प्रकल्पास तांत्रिक मार्गदर्शन तालुका कृषी अधिकारी, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड ॲग्रिकल्चरल पुणे हे करत आहे. मनोज वामन यांनी आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Care : अतिवृष्टी, पूरपरिस्थितीत पशुधनाची काळजी

Bail Pola Festival : जपा बैलांचे आरोग्य...

Soybean Crop Protection: जोरदार पावसानंतर सोयाबीन पिकावरील कीड-रोग व्यवस्थापन

Pomegranate Farming : डाळिंब शेतीत राज्यासाठी आदर्श ठरले पन्हाळे बंधू

Blockchain Technology: कृषी पुरवठा साखळीसाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT