Banana cultivation Agrowon
ॲग्रो विशेष

Banana Farming : धानपट्ट्यात केळी लागवड

Banana Rate : धानपिकासाठी प्रसिद्ध असलेल्या मूल तालुक्‍यात यंदाच्या हंगामात नगदी पीक असणाऱ्या केळी लागवडीला प्रोत्साहन देण्याचे नियोजन आहे.

Team Agrowon

Banana Cultivation Chandrapur News : धानपिकासाठी प्रसिद्ध असलेल्या मूल तालुक्‍यात यंदाच्या हंगामात नगदी पीक असणाऱ्या केळी लागवडीला प्रोत्साहन देण्याचे नियोजन आहे. मूल तालुका कृषी विभागाने त्यासाठी पुढाकार घेतला असून पहिल्या टप्प्यात १०० हेक्‍टरवर केळी लागवड होईल, अशी तयारी आणि नियोजन असल्याचे तालुका कृषी अधिकारी भास्कर गायकवाड यांनी सांगितले.

तालुक्‍यात एकूण लागवडीखाली २८ हजार हेक्‍टर क्षेत्र आहे. त्यामध्ये सर्वाधिक २४ हजार हेक्‍टरवर धान घेतले जाते. १ हजार हेक्‍टर कापशी, ५० ते ६० हेक्‍टर सोयाबीन व इतर पिकांचा समावेश आहे. धानासारख्या एकाच पिकावर अवलंबिता असल्यामुळे या भागातील शेतीचे अर्थकारण बदलले नाही.

ही बाब लक्षात घेता कृषी विभागाने केळी लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्याकरिता शेतकऱ्यांचे मत परिवर्तन केले जात आहे. त्यानुसार काही शेतकऱ्यांनी केळी लागवडीबाबत सकारात्मकता दर्शविल्याने पहिल्या टप्प्यात हे क्षेत्र १०० एकरांपर्यंत विस्तारण्याची शक्‍यता आहे.

धानपट्ट्यात पीक फेरपालट व्हावा याकरिता धान बांधीमध्ये केळी लागवडीला प्रोत्साहन देण्याचे नियोजन आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात काही शेतकरी केळी लागवडीसाठी पुढे आले आहेत. त्यांच्या माध्यमातून १०० एकरावर केळी लागवड होईल, अशी शक्‍यता आहे.
भास्कर गायकवाड,तालुका कृषी अधिकारी, मूल, चंद्रपूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT