Banana Crop Loss Agrowon
ॲग्रो विशेष

Banana Crop Loss: नांदेडमध्ये काढणीला आलेल्या केळी बागा भुईसपाट

Nanded Storm: वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे सोमवारी (ता. ९) नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर, मुदखेड, भोकर, नांदेड या तालुक्यांतील हजारो हेक्टरवरील केळी बागा भुईसपाट झाल्या.

कृष्णा जोमेगावकर

Nanded News: वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे सोमवारी (ता. ९) नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर, मुदखेड, भोकर, नांदेड या तालुक्यांतील हजारो हेक्टरवरील केळी बागा भुईसपाट झाल्या. याबाबत जिल्हा प्रशासनाने नुकसानीचा आढावा घेऊन पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिल्याची माहिती कृषी विभागाकडून मिळाली.

नांदेड जिल्ह्यात सोमवारी (ता. ९) सायंकाळी सातच्या सुमारास वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. या पावसाबरोबरच वाऱ्याचे प्रमाण अधिक असल्याने अनेकांच्या घरांवरील पत्रे उडाले. तर झाडेही उन्मळून पडली. वाऱ्याचा वेग जास्त असल्यामुळे कापणीला आलेल्या केळी बागा आडव्या पडल्या आहेत.

यामुळे जिल्ह्यातील अर्धापूर, मुदखेड, भोकर, नांदेड या तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसला. जूनमध्ये नांदेड जिल्ह्यातील केळीच्या बागा कापणीला येतात. अशावेळी वाऱ्यामुळे बागा भुईसपाट झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.

वादळाचा फटका मुदखेड तालुक्यातील बारड, निवघा, आंबेगाव, मुगट, डोंगरगाव, शेंबोली, नागेली, अर्धापूर तालुक्यातील पांगरी, पार्डी, शेणी, लहान-लोण यासह नांदेड व भोकर तालुक्यातील काही गावांना बसला आहे.

केळीच्या नुकसानीबाबत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी प्रशासनाशी संपर्क साधून नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सोमवारी झालेल्या नेसर्गिक आपत्तीचा आढावा घेऊन पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत.

सोमवारी जिल्ह्यातील नऊ मंडलांत अतिवृष्टीची नोंद झाली. यात कंधार तालुक्यातील कंधार मंडलात ८५.७५ मिमी, कुरुळा ८६, फूलवळ ६८.७५, उस्माननगर ८१.७५, लोहा तालुक्यातील लोहा मंडल ८१.७५, सोनखेड ८१.७५, कलंबर ८१.७५ व किनवमधील जलधारा ७२.७५, शिवणी ६९.२५ मिमी पावसाची नोंद झाली.

सोमवारी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अर्धापूर तालुक्यात केळी व इतर पिकांना प्रचंड फटका बसला. मुदखेड तालुक्यात अनेक ठिकाणी तर भोकर तालुक्यातही काही ठिकाणी नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे. जिल्हाधिकारी व संबंधित सर्व तहसीलदारांशी संपर्क साधून मी परिस्थितीचा आढावा घेतला व आवश्यक त्या सूचना दिल्या. नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे आजपासूनच होत आहेत.
- खासदार अशोक चव्हाण

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Chhattisgarh Urea Supply: छत्तीसगडमध्ये शेतकऱ्यांना दिलासा; केंद्राने ६० हजार मेट्रिक टन यूरिया मंजूर केला

GST Reforms India : दुग्धजन्य पदार्थांवरील GST कमी केल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा, जाणून घ्या कसा फायदा होणार?

Semiconductor Chip : आली पहिली 'मेड इन इंडिया' चिप! शेतकऱ्यांना कसा होईल फायदा?

Marathwada Flood: मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान; पंचनाम्यांना विलंब

Genome Paddy Variety : भारताने विकसित केलेल्या जगातील पहिल्या जिनोम संपादित भात वाणाची काय आहे खासियत?

SCROLL FOR NEXT